सर्व सामान्य घटकांना सोबत घेत समस्त कोकण विठ्ठल परिवार विश्र्वशांती अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न


 प्रतिनिधी:- केशव म्हस्के (रोहा)

समाजातील सर्व घटकांचा समावेश करून विठ्ठल परिवार रोहा यांच्या वतीने तळाघर येथील स्वंयभू तथा जागृत देवस्थान असलेल्या महादेव मंदिर येथे विश्र्वशांती अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तीभावाने संपन्न करण्यात आला.

       सालाबाद प्रमाणे याहीवर्षी २०१९ पासून सुरू करण्यात आलेला हा विश्र्वशांती अखंड हरिनाम सप्ताह समाजातील सर्वच घटकांना समाविष्ट करून साजरा करण्यात येत आहे.रायगड भूषण बाळाराम महाराज शेळके व नारायण महाराज दहिंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न करण्यात आलेल्या या सप्ताहप्रसंगी हरिपाठाचे नेतृत्व राम महाराज सावंत यांनी केले.तर शब्दसाधक ह.भ.प.अनिल महाराज महाकले,जामखेड-अहमदनगर यांची सुश्राव्य किर्तनरूपी सेवा झाली.याप्रसंगी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस विजय मोरे,महिला अध्यक्षा प्रितम पाटील,निलेश वारंगे,दिनेश पाशिलकर,राम नाकती,नरेश पाटील,अमित घाग,संदेश मोरे,विष्णू लोखंडे,अमित मोहिते,सतिश भगत,संतोष माने,महेश ठाकूर,यशवंत रटाटे,नारायण ठाकूर,संजयकाका मोरे,राकेश बामूगडे,गितराज म्हस्के,वसंत भोईर,रुपेश शिंदे,सचिन भगत ,विठ्ठल मोरे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.तर ह,भ,प नामदेव ओमले,मधूबूवा बामूगडे,महादेव कांबळे,तुकाराम कदम आदी जेष्ठ वारकरी व रविंद्र मरवडे, ओमकार जगताप, यांनी साथ संगित दिली तसेच सुनील भऊर,संकेत खेरटकर,वैभव खांडेकर,राम सावंत,रूपेश शेळके, विकास कोस्तेकर, विनोद कोस्तेकर,नरेश बामुगडे,केशव म्हस्के, गणेश नलावडे,दत्ता बाकाडे, प्रशांत ठाकूर,चेतन ओमले, सचिन तेलंगे, मिलिंद पवार, संदीप मालुसरे,अनिल महाबळे, अभिजितबामुगडे,गणेश दिघे,किरण ठाकूर,साबळे आदींनी किर्तनसाथ केली.तर सप्ताहाचेयशस्वीतेसाठी समस्त श्री.विठ्ठल परिवार तळाघर,लांढर,बोरघर,महादेववाडी,धाटाव,निवी,रोहा,किल्ला,वाशी,पालेखुर्द,संभे,आणि सर्व तरुण मंडळ यांनी मोलाचे सहकार्य केले.

Caption:- शब्दसाधक ह.भ.प.अनिल महाराज महाकले,जामखेड-अहमदनगर यांची सुश्राव्य किर्तनरूपी सेवेप्रसंगी समस्त विठ्ठल परिवार रोहा संकेत खेरटकर,वैभव खांडेकर,राम सावंत,रूपेश शेळके,किरण ठाकूर आदींच्या हस्ते सन्मान पूर्वक सत्कार करण्यात आले...

छायाचित्र :- केशव म्हस्के (खारी/रोहा)..

Comments

Popular posts from this blog