किशोर मालुसरे आदर्श तलाठी पुरस्काराने सन्मानित


तळा- कृष्णा भोसले 

तळा तालुक्यातील सोनसडे सजाचे तलाठी किशोर मालुसरे यांच्या कामाची दखल घेत माणगाव तालुका पत्रकार संघाचेवतीने कुणबी भवन माणगाव येथे दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ रोजी सन्मानपुर्वक गौरविण्यात आले.

   माणगाव तालुका पत्रकार संघाचे वतीने पालकमंत्री अदिती तटकरे,आमदार भरतशेठ गोगावले यांचे हस्ते मानपत्र,शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर सभापती अलका जाधव, संजय ढवळे भाजपा तालुकाध्यक्ष माणगाव, राजीव साबळे अध्यक्ष माणगाव तालुका शिक्षण प्रसारक मंडळ माणगाव, आनंदशेठ यादव माजी नगराध्यक्ष माणगाव, सुभाष केकाणे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, दिलदार पुरकर संपादक दैनिक रायगडचा आवाज,बाबुशेठ खानविलकर अध्यक्ष महाड मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस, सचिन बोंबले उपनगराध्यक्ष ,रचना थोरे सदस्या पं.स.अलिबाग, रामभाऊ टेंबे जेष्ठ नेते कुणबी समाज,योगीता चव्हाण माजी नगराध्यक्ष माणगाव,दिपकशेठ जाधव प्रदेश युवक सचिव राष्ट्रवादी काँग्रेस,विजयशेठ मेथा उद्योजक, सुभाषशेठ दळवी मराठी उद्योजक, दिनेश रातवडकर , राजेश मेथा नगरसेवक माणगाव, रमेश मोरे तालुका चिटणीस शेकाप,नवाजभाई मुलाणी उद्योगपती, सुरेश जैन, नितिन बामुगडे,आदी मान्यवर उपस्थित होते.

मालुसरे यांनी महाड, माणगाव तालुक्यातील मोर्बे तलाठी सजावर काम करताना नागरिकांच्या कामांना प्राधान्य दिले आहे.मृदुभाषिक,संयमी, शांत स्वभाव व

काम करण्याची सुगम पद्धत , जाणकार,अनुभवी वृत्तीचा सामान्य, शेतकरी, कष्टकरी अशा बहुजनांना योग्य न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न हे त्यांचे गुणवैशिष्टे आहेत.त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे सामान्यांमध्ये ते लोकप्रिय ठरले आहेत.त्यांच्या कामांचा इतरांनी आदर्श घ्यावा असाच आहे.

किशोर मालुसरे यांचा आदर्श तलाठी पुरस्काराने सन्मान झाल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog