तळा नगरपंचायतीच्या स्थायी समितीच्या सभापतींची निवड जाहिर
तळा-किशोर पितळे
तळा नगरपंचायतीच्या स्थायी समितीच्या सभापतींची निवड नगरपंचायत कार्यालयात बुधवार दि.१६ रोजी जाहिर करण्यात आली.
त्यामध्ये स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्षा सौ.अस्मिता चंद्रकांत भोरावकर, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता व शिक्षण सभापतीपदी सौ.अर्चना विजय तांबे, महिला, बालकल्याण क्रिडा व सांस्कृतिक सभापतीपदी कुमारी यामिनी जनार्दन मेहत्तर, सार्वजनिक बांधकाम व दिवाबत्ती सभापतीपदी उपनगराध्यक्ष चंद्रकांत महादेव रोडे,पाणीपुरवठा व जलनि:सारण सभापतीपदी गटनेते मंगेश रामचंद्र शिगवण,पर्यटन विकास व नियोजन सभापतीपदी अविनाश रविंद्र पिसाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तसेच स्विकृत नगरसेवक पदी राष्ट्रवादी कडून प्रकाश गायकवाड तर शिवसेनेकडून भास्कर गोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.निवड झालेल्या सर्व सभापती व स्विकृत नगरसेवकांचे पिठासीन अधिकारी विठ्ठल इनामदार व दयानंद गोरे यांनी अभिनंदन केले. या प्रसंगी शिवसेना,भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
Comments
Post a Comment