अभंग सेवा मंडळातर्फे स्नेहमेळावा उत्साहात संपन्न 


रोहा -निखिल दाते

गेली 30 वर्ष रोहे शहर व परिसरामध्ये सेवाभाव जपणारी संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या अभंग सेवा मंडळातर्फे रविवार दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रातील कलाकारांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला .

       या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रातील सुमारे 25 कलाकारांनी आपली कला सादर करून उत्तम सांस्कृतिक कलागुणदर्शन व प्रबोधन केले .

     विविध क्षेत्रातील जाणकारांची मनोगते ,बहारदार न्रुत्य ,प्रकाश कुंटे यांनी सादर केलेल्या नकला,वाद्य वादन ,काव्य सादरीकरण ,एकपात्री अभिनय यासारख्या विविध कलागुणदर्शनांमुळे ही संध्याकाळ उत्तरोत्तर रंगत गेली .

           आकाशवाणीचे ज्येष्ठ निवेदक किशोर सोमण ,रोह्यातील ज्येष्ठ विधीज्ञ प्राची भिडे यांनी या विविध कलागुणदर्शनाचे परीक्षण केले ,यामध्ये विनय गोगटे यांच्या सादरीकरणाला प्रथम ,निखिल दाते यांच्या सादरीकरणाला द्वितीय तर कु.शमिका रत्नपारखी हिच्या सादरीकरणाला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

    यावेळी अभंग सेवा मंडळातर्फे कोव्हिड काळात केलेल्या व करत असलेल्या अविरत वैद्यकीय सेवेबद्दल डॉ .शिरीषकुमार पेंडसे व डॉ .शंतनु आठवले यांचा विशेष सत्कार करण्यात आला .

        कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल उपस्थितांनी अभंग सेवा मंडळाचे श्री .हेमंत ओक व सर्व सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले .

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अभंग सेवा मंडळाचे अध्यक्ष विवेक बापट ,उदय ओक ,प्रकाश कुंटे ,प्रमोद फाटक ,विकास फाटक ,आनंद धारप ,दिपक बापट ,राम आठवले ,आदित्य ओक ,सौ.माया ओक ,सौ.मनीषा ओक ,सौ.विशाखा बापट ,सौ.आरती धारप ,सौ.सुषमा फाटक ,सौ.अंजली कुंटे आदींसह सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले .

Comments

Post a Comment

Popular posts from this blog