खांब-चिल्हे-देवकान्हे विभागात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा



कोलाड- श्याम लोखंडे 

 रोहा तालुक्यातील खांब चिल्हे देवकान्हे विभागात मौजे खांब, नडवली, तळवली, चिल्हे, धानकान्हे, बाहे, देवकान्हेसह विभागात अनेक  ठिकाणी बहुजन प्रतिपालक ,कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली.

  अखिल मानव जातीचे उद्गाते,सर्व धर्म समभाव ,समतेचे प्रतीक म्हणून लौकिक मिळवलेल्या एकमेवाद्वितीय छ. शिवरायांची शिवजयंती भारतवासियांचा राष्ट्रीय उत्सव आहे. या उत्सवाचे औचित्य साधून स्वा.सु.नि.अलीबागकर महाराज,गोपालबाबा वाजे,धोंडू बाबा कोल्हटकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खांब पंचक्रोशीतील मौजे चिल्हे येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा ३९२ वे जन्मोत्सव सोहळा शनिवार दि.१९/२/२०२२ रोजी  खांब देवकान्हे विभागात राजे शिवरायांची जयंती विविध कार्यक्रमानी साजरी करण्यात आली, 

ज्ञानांकुर इंग्लिश मिडियम स्कूल खांब,राजिप शाळा खांब,नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचालित रा. ग .पोटफोडे मास्तर विद्यालय व कै. द. ग. तटकरे कनिष्ठ महाविद्यालय खांब,राजिप शाळा नडवली,राजिप शाळा तळवली तर्फे अष्टमी,राजिप शाळा चिल्हे ,तसेच पत्रकार रायगड भूषण डॉ. श्यामभाऊ लोखंडे यांच्या निवासस्थांनी यशवंत नथू लोखंडे स्मृती सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय ,ग्रामस्थ व युवक मंडळ चिल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली.यावेळी ग्रुप ग्राम पंचायत तळवली तर्फे अष्टमीच्या सदस्या सौ. रिया लोखंडे ,रविद्र लोखंडे,कल्पेश महाडिक,अविष्कार खांडेकर,अमर महाडिक, सौ पूजा लोखंडे,आदी शिवप्रेमी युवक उपस्थित होते.

राजिप शाळा धानकान्हे,आ.वाडी,राजिप शाळा बाहे,राजिप शाळा देवकान्हे, या विविध ठिकाणी लहांनापासून आबालवृद्ध नागरिकांनी मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात छत्रपती शिवरायांना मानवंदना देऊन, जय घोषात विविध ठिकाणी तसेच विविध कार्यक्रमांनी हा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog