ग्रुप ग्रामपंचायत मेढा उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे रविंद्र जाधव बिनविरोध
कोलाड - श्याम लोखंडे
रोहा तालुक्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायत मेढा या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी सरपंच स्नेहा महेंद्र खैरे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणुक घेण्यात आली. यामध्ये उपसरपंच पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रविंद्र एकनाथ जाधव यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीच्या सर्व प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर रविंद्र एकनाथ जाधव यांचा अर्ज वैध ठरवून त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणुक अधिकारी तथा सरपंच स्नेहा खैरे यांनी केली. या झालेल्या निवडणुक प्रक्रियेत सरपंच स्नेहा खैरे मावळते उपसरपंच उदय मोरे, सदस्या नम्रता सुतार, नम्रता महाले, श्रेजल उंबरे, ज्ञानेश्वरी गोवर्धने, समिक्षा जवके शेवंती शिद यांनी सहभाग घेऊन उपस्थिती दर्शवली. मावळते उपसरपंच उदय मोरे यांनी आपला उपसरपंच पदाचा कार्यकाळ पुर्ण केल्याने त्यांनी राजीनामा दिल्याने सदर उपसरपंच पदाची निवडणुक घेण्यात आली.
उपसरपंचपदी रविंद्र जाधव यांची निवड झाल्यानंतर सरपंच स्नेहा खैरे, मावळते उपसरपंच उदय मोरे व उपस्थित सदस्यांनी सन्मानानी उपसरपंच पदाच्या आसनात बसविले व त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दरम्यान रोहा पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मण महाले, सरपंच स्नेहा खैरे, माजी उपसरपंच उदय मोरे, ग्रामसेवक अमोल तांबडे यांनी उपसरपंच रविंद्र जाधव यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार व अभिनंदन केले.
या उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी माजी सभापती लक्ष्मण महाले, मेढा हायस्कुल चेअरमन, भगवान गोवर्धने, रोहा तालुका युवा कार्याध्यक्ष महेंद्र खैरे, मेढा ग्रा.पं. तंटामुक्त अध्यक्ष विलास खांडेकर, माजी सरपंच, विलास उंबरे, माजी सरपंच संतोष सुतार, माजी सरपंच, ज्ञानदेव शेलार, विजय मोरे, जितेंद्र जाधव, चंद्रकांत गोवर्धने, शरद गोवर्धने, दिनेश घरट, प्रतिक वजले, भिसे ग्रा.पं. तंटामुक्त अध्यक्ष हरिश्चंद्र ठमके, आत्माराम घरट, लोकशाहीर सुरेंद्र जाधव, अशोक मोरे, सुरेश दाईटकर, संदिप जाधव, शरद जाधव, महेंद्र जाधव, संतोष जाधव, राजेंद्र जाधव, विजय जाधव, प्रथमेश जाधव, प्रतिक जाधव, प्रसाद साळुंखे, दिनकर पवार, श्रवण जाधव, सार्थक जाधव, छगन लाड, शुभम उंबरे, आदिमान्यवर उपस्थित होते. निवडणुक बिनविरोध व शांतेत पार पाडल्याने ग्रामसेवक तांबडे यांनी सर्वांचे आभार मानले. उपसरपंचपदी रविंद्र जाधव यांची निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment