पत्रकार विराज टिळक तळा शहरातील विविध समस्ये बाबत करणार उपोषण


तळा:किशोर पितळे

तळा शहरातील विविध समस्ये बाबत पत्रकार विराज टिळक यांनी प्रशासनाला उपोषणाचा ईशारा दिला आहे.तळा तालुका निर्मिती होऊन जवळपास २२ वर्षे उलटून गेली आहेत. परंतु तळा शहरातील नागरिकांना नेहमी भेडसावणाऱ्या समस्या कायम आहेत.शहरातील नागरिकांना दररोज वेळेवर पाणी न मिळता ते एक दिवसाआड रात्री अपरात्री मिळते.या कारणामुळे नोकरदार वर्ग तळा शहरात न राहता आजूबाजूच्या तालुक्यात राहणे पसंत करतात. यामुळे तळा शहरातील बाजारपेठेवर आर्थिक परिणाम होत आहे. व्यवसाय होत नसल्याने लहान व्यापारी कर्जबाजारी झाले आहेत. कित्येकांचे व्यवसाय बंद झाले आहेत तर काही व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे बाजारपेठ देखील ओस पडत चालली आहे.यासाठी तळा शहराला मुबलक व दररोज वेळेवर पाणी मिळावे अन्यथा वार्षिक पाणी कर निम्मा करावा,गटारावर झाकणे टाकावीत जेणेकरून अपघात टळतील,नाना नानी पार्क ची दुरुस्ती करण्यात यावी,शहराचे सुशोभीकरण करण्यात यावे,मोकाट गुरांसाठी कोंडवाडा करावा जेणेकरून अपघात टळतील,डम्पिंग ग्राऊंड ची व्यवस्था करणे,पाण्याच्या  व्हॉल्वच्या ठिकाणी बंधीस्त चेंबर करावे,रस्त्यावरचे सांडपाणी गटारातजाण्यासाठी व्यवस्था करणे,लहान मुलांना खेळण्यासाठी बालोद्यान करावे यांसारख्या ईतर विविध मागण्यांसह तळा नगरपंचायतीसमोर उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन विराज टिळक यांनी नगरपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यात दिले आहे.

Comments

Popular posts from this blog