उभारे परिवारातील विवाह सोहळ्यास पालकमंत्री अदिती तटकरे यांची सदिच्छा भेट 


कोलाड-शरद जाधव

      इंदापुर येथील उभारे परिवारातील विवाह सोहळ्यास रायगड च्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री आदितीताई तटकरे यांनी गांधी हॉल (माणगांव)येथे हजेरी लाऊन नव दांपत्यास शुभेच्छा दिल्या.

        रायगड पाटबंधारे विभाग कोलाड शाखा अभियंता राजेंद्र उभारे(रावसाहेब) यांचे सुपुत्र चिरंजीव प्रतिक याच्या विवाह सोहळ्यास पालकमंत्री आदितीताई तटकरे यांनी आवर्जून उपस्थिती लावली व चिरंजीव प्रतिक व चि. सौ.का. जागृती यांना पुढील वाटचाली च्या शुभेच्छा दिल्या.

     यावेळी पालकमंत्र्यांसमवेत दिपक जाधव ,राजेश मेहता ,उदय अधिकारी, संदेश मालोरे, काका नवगणे व इतर मान्यवर उपस्थित होते.तसेच पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी सहाय्यक श्वेता चिंचुळकर, कर्मचारी बांधव, सगे -सोयरे,आप्तईस्ट मंडळी विवाह सोहळ्यास उपस्थित होते.

     यावेळी राजेंद्र उभारे परिवारातर्फे अदितीताई यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातुन  वेळ काढून विवाह सोहळ्यास उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog