"महाराष्ट्राच्या परंपरेला शोभेल असे मत मांडा,चुकीच्या विधानांनी राजकारणाचा दर्जा ढासळता कामा नये"-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन

रोहा येथे डॉ.सी.डी.देशमुख शहर सभागृहाचे भुमिपुजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न


रोहा-सचिन साळूंखे

भारताचे पहिले अर्थमंत्री,थोर अर्थतज्ज्ञ डॉ.सी.डी.देशमुख यांच्या जन्मभुमीत त्यांच्या नावाने साकारत असलेल्या शहर सभागृहाचे भुमिपुजन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार रोहे नगरीत होते.त्यावेळी व्यासपिठावरुन बोलताना त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना वरील वक्तव्य केले. रविवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी  सकाळी ठिक १०-३० वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला.

कोकणचे विकासपुरुष खासदार सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी या कार्यक्रमाची जय्यत तयारी   केली होती.अजितदादांच्या स्वागतासाठी रोहे नगरी सज्ज झालेली दिसत होती.कार्यकर्त्यांनी जागोजागी लावलेल्या कमानी,फ्लेक्स बॕनर लक्ष वेधून घेत होत्या.सुतारवाडी पासून रोह्यापर्यंत राष्ट्रवादी कार्यकर्ते अजितदादांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे होते.

यावेळी व्यासपिठावर उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे समवेत पालकमंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेतभाई तटकरे,माजी आमदार सुरेश लाड,सुधाकर घारे,मधुकर पाटील,विजयराव मोरे,विनोदभाऊ पाशिलकर,रामचंद्र सकपाळ,सुरेश मगर,संतोष पोटफोडे,अमित उकडे,प्रितम पाटील,जयवंत मुंडे,जिल्हाधिकारी रायगड व अनेक मान्यवर उपस्थित होते.


आमदार अनिकेत भाई तटकरे यांनी रोह्याच्या सर्वांगिण विकासासाठी केलेल्या कामाचा मागोवा घेतला तर पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या भाषणात रोह्यासाठी विशेष स्त्री रुग्णालयास मंजूरी दिल्याबद्दल अजितदादांचे आभार मानले.

खासदार सुनिल तटकरे यांनी बोलताना शहर सभागृह,नदीसंवर्धन प्रकल्प व रायगड जिल्हा व रोह्यातील विविध विकासकामांचा मागोवा घेताला.रेवस रेड्डी सागरी महामार्गाच्या कामाला गती मिळावी व बारामतीच्या धर्तीवर सुसज्ज पंचायत समिती कार्यालय रोह्यात व्हावे हि मागणी त्यांनी अजित तटकरे यांचेकडे केली.

        आपल्या मनोगतात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ह्यासाठी केंद्राला विनंती केली.कोरोनामुळे राज्याचे अर्थिक उत्पन्न घटले तरी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांना खिळ बसली नाही.अलिबागच्या मेडिकल काॕलेजसाठी ४०६ कोटींचा निधी उपलब्ध केला.

युक्रेन राशिया युध्दामध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार्याने महाराष्ट्र शासन प्रयत्न करित आहे.सरकार परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रोह्यातील २२कोटी ७०लाख रुपयांचे शहर सभागृह होताना निधीची कमतरता पडणार नाही असे अर्थमंत्री म्हणून शब्द देतो.काम दर्जेदार व डॉ.सी.डी.देशमुखांच्या नावाला साजेसे असावे असे बोलून त्यांनी देशाच्या पहिल्या नोटेवर सही असलेल्या डॉ.सी.डी.देशमुखांच्या स्मृतीस अजितदादांनी वंदन केले.डॉ.सी.डी.देशमुखांच्या आठवणी सांगताना त्यांनी सांगितले की त्यांना बाॕटनी विषयाची आवड होती.ते सतत बागकामात व्यस्त असत म्हणून त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ डॉ.सी.डी.देशमुखांच्या नावे उद्यान उभे करावे,त्यास निधीची उपलब्धता केली जाईल असे स्पष्ट केले.

तटकरे साहेबांनी मागणी केलेल्या सर्व विकासकामांचे प्रस्ताव पाठवावेत त्यांना मंजूरी देण्याचे काम केले जाईल असे अजितदादांनी सांगितले.पालकमंत्री आदितीताई यांचे मंत्रिमंडळातील कामाचे कौतुक केले.रोह्यातील कुंडलिका नदी संवर्धन योजनाही अजितदादांच्या पसंतीस उतरली. 

शेवटी नगरपालिका मुख्याधिकारी गोरे यांनी आभार मानले तर महाराष्ट्र भाषा गौरवदिना निमित्ताने रायगड पोलिसांच्या बँड पथकाने राष्ट्रगीत वाजवून कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमासाठी रोहा शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog