तळा कॉलेजमध्ये मोफत कॅन्सर जनजागृती व तपासणी शिबीर संपन्न
तळा : किशोर पितळे
तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळा आणि इंडियन कॅन्सर सोसायटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच तहसील कार्यालय तळा, तळा नगरपंचायत, तालुका आरोग्य कार्यालय व डॉक्टर्स असोसिएशन तळा यांचे सहकार्याने शनिवार दिनांक २६ फेब्रुवारी व रविवार दिनांक २७ फेब्रुवारी,२०२२ सकाळी ८ ते सांयकाळी ५ या वेळेत द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय, तळा येथे मोफत कॅन्सर जनजागृती व तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उद्धघाटन प्रसंगी, तहसीलदार श्री अण्णाप्पा कनशेट्टी, तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री मंगेश देशमुख, चित्राताई साळसकर, द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन डॉ.श्रीनिवास वेदक गो.म.वेदक विद्यालयाचे चेअरमन श्री महेंद्रशेठ कजबजे, प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री. किरणशेठ देशमुख,तळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ अस्मिता भोरावकर,सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता व शिक्षण सभापती सौ. अर्चना तांबे,डॉ. कुरुक्कर,श्री. खातू, शिर्के गुरुजी, श्री. बैकर, प्राचार्य डॉ. निंबाळकर, इंडियन कॅन्सर सोसायटीचे मॅनेजर श्री.अशोक चव्हाण, कॅम्प कॉर्डिनेटर श्री.सुधाकर चौगुले, गायनॉकॉलॉजिस्ट डॉ.नीना पटवर्धन, डेंटल सर्जन डॉ. विशाल पंजाबी, फिजिशियन डॉ. प्रियांका राठोड, अटेंडंट हनिफ शेख,शंकर बहाद्दूर,ज्योती भांगरे, सविता सरवदे,अंकुश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर शिबीराचे सलग दोन दिवस मोफत आयोजन केले होते. या शिबिरात तळा तालुक्यातील १२५ शिबिरार्थीनी आपल्या आरोग्याची तपासणी केली असून तपासणी केलेल्या एकाही रुग्णांना कॅन्सरची लक्षणे नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या शिबिरात पुरुषांसाठी संपूर्ण शारीरिक तपासणी, मौखिक (तोंडाचा कॅन्सर) तपासणी, स्त्रियांसाठी स्त्रीरोग तज्ञांकडून संपूर्ण शारीरिक तपासणी, व्ही.आय. ए.( गर्भाशयाच्या कॅन्सरची तपासणी), स्त्री तज्ज्ञ डॉक्टरांकडून स्तनाच्या कॅन्सरची तपासणी आदी तपासण्या मोफत तपासणी करून कॅन्सर होऊ नये याबाबत मार्गदर्शन केले,सदर शिबीर यशस्वी होण्यासाठी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, द.ग.तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment