मेढा येथे विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन

खासदार सुनिल तटकरे साहेबांची प्रमुख उपस्थिती 

रोहा-शरद जाधव

         रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मेढा येथे खासदार सुनिल तटकरे यांच्या शुभहस्ते व पालकमंत्री अदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या उपस्थितीत विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा दिनांक २६ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे.सदर सोहळ्याची जय्यत तयारी मेढा ग्राम पंचायत तसेच भिसे ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आली असल्याची माहिती मेढा विभागाचे यूवा नेते मयुर खैरे यांनी दिली.

सदर सोहळ्यास मधुकर पाटील,विनोद पाशिलकर, विजयराव मोरे,नंदकुमार म्हात्रे, लक्ष्मण महाले ,राजेश्री पोकळे, राजू पोकळे अनंता देशमुख, प्रितम पाटील ,प्रदीप देशमुख  जयवंत मुंडे, संतोष भोईर, प्रसाद देशमुख, नवनीत डोलकर,गजानन खांडेकर, रघुनाथ करंजे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

          मेढा विभाग हा स्वर्गीय दत्ताजीराव तटकरे यांच्या पासुन तटकरे कुटूंबाचा बालेकिल्ला आहे.आज तटकरे घराण्याची चौथी पिढी अदितीताई,अनिकेतभाई हे राजकिय घराण्याचा वारसा समर्थपणे संभाळताना दिसत आहेत,या बालेकिल्ल्यात वाकेश्वर मंदीर लोकार्पण सोहळा, भिसे बसस्थानक ,व्यायाम शाळा ,रस्ते,अशा विविध विकास कामांचे उध्दघाटन सोहाळे संपन्न होणार आहेत.

लोकार्पण कार्यक्रमांबरोबर आयोजित सभा ही मेढा हायस्कूलच्या भव्य मैदानात सायं. ठिक 4 वाजता होणार असुन खासदार सुनिलजी तटकरे साहेब कार्यकर्त्याना मार्गदर्शन करणार आहेत.

            कार्यक्रमाची जय्यत तयारी मेढा सरपंच सौ. स्नेहा महेंद्र खैरे उपसरपंच उदय मोरे, भिसे सरपंच सौ. सुप्रिया चंद्रकांत ठमके, उपसरपंच तानाजी जाधव , सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ करीत आहेत.

               आगामी जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणुकीच्या मतदारसंघ बांधणीच्या दृष्टिकोनातून ह्या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Comments

Popular posts from this blog