"धामणसई  पंचक्रोशीत  विकासकामांना गती मिळणार"-  आमदार अनिकेतभाई तटकरे


रोहा-शरद जाधव

                    रोहा तालुक्यातील धामणसई  पंचक्रोशीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व खासदार सुनिल तटकरे यांच्या माध्यमातून विकासाला मोठ्या प्रमाणात गती मिळणार असल्याचे वक्तव्य कोकणचे आमदार अनिकेत भाई तटकरे यांनी केले.

               मालसई ग्रामपंचायत हद्दीतील मुठवली खुर्द  येथील स्मशानभुमी  व निवारा शेड तसेच मालसई  येथील साकव, सांगडे बौद्ध विहार शेड ,अशा विविध विकास कामांच्या उद्नघाटन प्रसंगी ते बोलत होते.

या भागाला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभला आहे, आजही हा वारसा समर्थपणे सांभाळला जात आहे. रोहा शहराला लागुन गावे असुनही पाहिजे तेवढा विकास झाला नाही. पेण मतदार संघाला ही गावे जोडल्यामुळे विकास काय असतो? हे येथील लोकांना माहितच नाही.झाले ते गेले आज येथील तरुणाई माझ्यावर जीवापाड प्रेम करते आहे.त्याच पध्दतीत त्यांचीही मने जपून त्यांना प्रेम देणार आहे.भविष्यात  विकासाच्या बाबतीत या भागाला मागे वळून पहायची वेळ येणार नाही,असा ठाम विश्वास अनिकेतभाई तटकरे यांनी व्यक्त  केला.



   यावेळी तालुकाध्यक्ष विनोदभाऊ पाशीलकर, प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, विभाग अध्यक्ष अनंत देशमुख, यूवक अध्यक्ष जयवंत मुंडे, सरपंच रसिका मालुसरे,चिंतामणी खांडेकर,मयुर खैरे, गौरव सुर्वे,घनश्याम कराळे,हेमंत कडव,प्रसाद देशमुख,अनिल भगत, तानाजी देशमुख,रविना मालुसरे, योगेश शिंदे, महेश तुपकर,राम सावंत,निलेश मालुसरे,हेमंत मालुसरे,सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेविका रेश्मा वेटकोळी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मुठवली खुर्द येथील भवानी माता मंदीरा समोर प्लेव्हर ब्लॉक तसेच भैरवनाथ मंदीरा करिता सात लाख रुपयांचा निधी देण्याचे अनिकेत भाई तटकरे यानी आश्वासन दिले. तर यावेळी मुठवली स्मशानभूमीचे काम दर्जेदार केल्याबद्दल मारुती तुपकर यांचे आमदार अनिकेत भाई यांनी कौतुक केले.


या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेल्या आमदार अनिकेत भाई तटकरे यांनी यावेळी या गावातील राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते महेश तुपकर यांच्या घरी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला .

      कार्यक्रमाचे प्रास्तविक पोलिस पाटील राम सावंत यांनी केले तर  सुत्रसंचालन रोहा तालुका युवती अध्यक्षा कु.रविना मालुसरे यांनी केले.

                कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुठवली खुर्द ग्रामस्थ व महिला मंडळ व तरुण मंडळ यांनी अथक मेहनत घेतली.

Comments

Popular posts from this blog