तळा तहसिल कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन जनजागृती शिबिर
तळा-कृष्णा भोसले
आपत्ती व्यवस्थापन जनजागृती करणेसाठी मा.जिल्हाधिकारी यांचे आदेशाने जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांमध्ये प्रात्यक्षिक व जनजागृती कार्यक्रम राबवित येतआहे.त्याचाच भाग म्हणुन तळा तहसिल कार्यालयात व प्रांगणात या शिबिराचे आयोजन २३ व २४ फेब्रुवारी २०२२ रोजी करण्यात आले होते.
या शिबिराला तळा तहसिलदार अण्णाप्पा कन्नशेटटी, नायब तहसिलदार स्मिता जाधव, महसुल नायब तहसिलदार सुरेखा घुगे, सर्व कर्मचारी,मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.या शिबीरात अनेक प्रात्यक्षिक शशिकांत शिरसाठ सहाय्यक उपनियंत्रक नागरी संरक्षक उरण यांनी दाखविली.
सदरच्या शिबिरात प्रथमोपचार ,पुर, व दरडी कोसळणे,अग्नी, विमोचन,इत्यादी प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.ही प्रात्यक्षिके पाहील्यानंतर यांचा अशा प्रसंगात नक्कीच फायदा होणार आहे.
Comments
Post a Comment