" बेस्ट टिचर अवाॕर्ड " मिळाल्याबद्दल आदर्श शिक्षक सहदेव कापसे यांचा खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते सत्कार
वरसगांव ता.रोहा येथे आयोजित विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमात खासदार श्री.सुनिल तटकरे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक श्री.सहदेव कापसे यांना सन्मानित करण्यात आले.रा.जि.प.केंद्रशाळा तिसे ता.रोहा येथे विषयशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या श्री.सहदेव कापसे यांना,अविष्कार फौंडेशन सामाजिक व एज्युकेशनल संस्था कोल्हापूर यांच्यावतीने सन 2021 चा "बेस्ट टिचर अवार्ड" मिळाल्याबद्दल खासदारांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपिठावर जि.प.सदस्य श्री.दयाराम पवार, रोहा पं.स.सदस्या सौ.सिद्धि राजिवले,पं.स.सदस्या सौ.सुनिता महाबळे, श्री.रामचंद्र चितळकर, गोवे सरपंच श्री.महेंद्र पोटफोडे,श्री.नरेंद्र जाधव- जि.प.गट अध्यक्ष,श्री.मनोज शिर्के- पं .स.गण अध्यक्ष, श्री.प्रकाश थिटे,श्री.नारायण धनवी,सौ.प्रितम पाटील-रोहा तालुका महिला अध्यक्ष,श्री.राम मरवडे तसेच पंचक्रोशीतील सर्व सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.
श्री.सहदेव कापसे सर म्हणजे,बत्तीस वर्षांची प्रदिर्घ यशस्वी शैक्षणिक सेवा, विविध शैक्षणिक उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी,डिजिटल शाळा निर्मिती,सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कार्य, आदिवासीवाडी शाळेवर कार्यरत असताना वंचितांच्या शिक्षणासाठी केलेले प्रभावी काम, सुंदर व आकर्षक शालेय इमारत निर्मिती, विज्ञान प्रदर्शनातील शैक्षणिक साहित्य निर्मितीतील भरीव कार्य, गीत मंच-पथनाट्य इ.उपक्रमांतुन कलाविष्कार,सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित शंभूराजे महानाट्यामध्ये पंतांची साकारलेली भूमिका व तिचे झालेले कौतुक, अशी शेकडो गुणवैशिष्टे अंगी असलेले एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व.
अशा कलाप्रेमी आदर्श शिक्षकाला सन्मानित केल्याने समाधान व्यक्त होत आहे.
आपल्या जन्मभुमीतील सत्काराने आपण भारावून गेलो असल्याचे तसेच हा सन्मान आपणास अधिक समाजाप्रती दृढता निर्माण करणारा ठरला असे सत्काराला उत्तर देताना श्री.सहदेव कापसे यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमास पंचक्रोशीतील मान्यवरांसह सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,प्रतिष्ठित नागरिक,महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री.सहदेव कापसे सरांचे परिसरातील मान्यवर व जनतेकडून अभिनंदन केले जात आहे.
अतिशय सुंदर शब्दात बातमी तयार करून डिजिटल बातमी दिल्याबद्दल संपादक व सर्व आपल्या संच्याचे मनःपूर्वक अभिनंदन व धन्यवाद.
ReplyDelete