संध्या विजय दिवकर यांची कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रोहा शाखेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड


रोहा-सचिन साळुंखे

कोमसापच्या अध्यक्षपदी संध्या विजय दिवकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रोहा शाखेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी नविन अध्यक्षपदाची निवड करण्यात आली. सुखद राणे यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर, रिक्त पदासाठी निवड करण्यात आली, संध्या विजय दिवकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली, तसेच कार्याध्यक्षपदी आरती धारप यांची निवड झाली.

संध्या दिवकर ह्या रोहा नगरपरिषदेच्या आदर्श प्राथमिक  शिक्षिका, प्राथमिक शिक्षक पतपेढी रोहा शाखेच्या मा.चेअरमन व विद्यमान संचालिका असून उत्कृष्ट सुत्रसंचालिका,गजलकारा, आगरी कवयित्री म्हणून नावारुपास आलेल्या आहेत.  कविता, गझलच्या माध्यमातून आपल्याला कार्याचा ठसा उमटवला आहे.

रोहा येथे झालेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सभेच्या अध्यक्षस्थानी  सुखद दादा राणे, हणमंत शिंदे,आरती धारप,संध्या दिवकर,आचला धारप,साधना जोशी,मानसी चाफेकर, ज्योती शिंदे, पत्रकार सचिन साळूखे, राजेंद्र जाधव, क्षिरसागर ,पानावकर , विजय दिवकर,शेरमकर यांसह अन्य सदस्य उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog