तळा शहरात असंख्य रंगीत खड्यांनी साकारली शिवरायांची भव्य प्रतिमा

तळा- कृष्णा भोसले

तळा शहरात शिवजयंती निमित्त गोपीनाथ महादेव वेदक महाविद्यालयाच्या पटांगणावर छत्रपती शिवाजी महाराजांची ३० फूट अशी भव्य प्रतिमा साकारण्यात आली.ही कलाकृती साकारण्यासाठी दोन ब्रास खडी,चुना यांसह विविध रंगांचा वापर करण्यात आला आहे.महाविद्यालयाचे कला शिक्षक विनोद कोळवणकर व सुहास वावेकर यांच्या संकल्पनेतून त्यांचे विद्यार्थी आकाश शिंदे, कैलास सातांबेकर,ओमकार कजबजे,योगेश सुतार, अजिंक्य मुळे, कौस्तुभ मेकडे,राज शिंदे यांनी ही प्रतिमा साकारण्यासाठी गेली तीन दिवस विशेष मेहनत घेतली.

यावेळी उपस्थित आ. अनिकेत तटकरे यांनी  सर्व कलाकारांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष कौतुक केले तसेच आजच्या तरुण पिढीमध्ये शिवाजी महाराजांचे विचार व त्यांचा जाज्वल्य इतिहास किती खोलवर रुजलेला आहे याची प्रचिती या प्रतिमेकडे पाहून समजते असे मत व्यक्त केले.Comments

Popular posts from this blog