सप्तसुत्री कार्यक्रमांतर्गत आदिवासी बांधवांना दाखले वाटप संपन्न
तळा तालुक्यात कातकरी उत्थान अभियानांतर्गत महागाव आदिवासीवाडीत प्रभावी अमंलबजावणी
तळा- कृष्णा भोसले
तळा तालुक्यातील महागाव आदिवासीवाडीवर सप्तसुत्री कार्यक्रमांतर्गत कातकरी उत्थान अभियानाची प्रभावी अमंलबजावणी निमित्ताने रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, उपविभागीय अधिकारी प्रशाली दिघावकर यांचे आदेशाने व तळा तहसिलदार अण्णाप्पा कन्नशेटटी यांचे मार्गदर्शनाखाली दाखले वाटप करण्यात आले.
स्वातत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त या तालुक्यातील आदिवासी बांधवांना दाखले वाटप करताना महागाव आदिवासीवाडी येथे जातीचे दाखले -१५०, सातबारा उतारा १७५,उत्पन्नाचे दाखले त्याचबरोबर शिधापत्रिका यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी महसुल सहाय्यक विश्वास पाटील यांनी आदिवासी बांधवांना, महसुल,कृषी योजना, याविषयी विस्तृत माहिती दिली.सर्वहरा जनआदोंलनाचे ज.वि.गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.उपस्थितांना महागाव तलाठी बी.जी.बासांबेकर यांनी मार्गदर्शन केले.गावचे पोलीस पाटील कमलाकर मांगले,निवृत्त शिक्षक अनंत वारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment