रोहा तालुका चर्मकार समाजाच्या वतीने जामगाव येथे संत रोहिदास जयंती साजरी

संत विचारांच्या उजळणीने समाजबांधव झाले मंत्रमुग्ध    रोहा- प्रतिनिधी 

रोहा तालुका चर्मकार समाजाच्या वतीने जामगाव येथे संत रोहिदास जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात संत रोहिदासांच्या मौलिक विचारांची उजळणी करण्यात आली. यंदा छोटेखानी स्वरूपात आयोजन करण्यात आलेल्या या कार्यक्रमात संतवाणीच्या उजळणीने एक वेगळी ऊर्जा निर्मिती केली, तर संतांच्या मौलिक विचारांनी उपस्थित समाजबांधवांचे प्रबोधन झाले. 

      रोहा तालुका चर्मकार संघटना व संत रोहिदास नगर जामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने संत रोहिदास जयंतीउत्सवाचे छोटेखानी स्वरूपात आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपिठावर चर्मकार समाजाचे रोहा तालुकाध्यक्ष समीर नागोठकर, माजी तालुकाध्यक्ष प्रशांत म्हशीलकर, सरचिटणीस गणेश चांदोरकर,जामगाव स्थानिक पंचायतीचे अनंत जांभळे, सहचिटणीस राजन बिरवाडकर, जगदीश नागोठकर, ज्येष्ठ मार्गदर्शक रमेश पाबरेकर, उमेश चिपळूणकर, परेश सिलिमकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची प्रतिमापूजन व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाले. 


यावेळी ज्येष्ठ प्रमुख वक्ते शरद नागोठकर व पांडुरंग भोंनकर यांनी संताचे विचार मांडले, संतवाणीने विविध विषयांवरील व्याख्यानाने उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले. कर्म करा, नित्य कर्मानेच धर्म घडले आणि त्यातूनच परमात्मा सिद्धी होईल, संत विचारधाराच मानवाच्या जगण्याचे साधन असून संतांनी दाखविलेल्या मार्गाचे आपण अनुकरण करून आपले जिवन सुंदर आणि समाधानी केले पाहिजेत, आदि संत रोहिदासांचे दोहे तसेच विचारांची उजळणी या कार्यक्रमात करण्यात आली.

      समाजाचे रोहा तालुका सरचिटणीस गणेश चांदोरकर यांनी सूत्रसंचालन केले तर सहचिटणीस राजन बिरवाडकर यांनी आभार मानले, यावेळी महिलांच्या हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न झाले, तर अल्पपोहाराने उत्सवाची सांगता झाली. जयंती उत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी तालुका पदाधिकारी यांच्यासह जामगाव रोहिदास नगर पंचायतीचे अनंत जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली जामगाव संत रोहिदास नगर येथिल आशा सेविका पौर्णिमा रविंद्र जांभळे, ज्योती जितेंद्र म्हशीलकर, अक्षता अंकुश जांभळे, उषा मधुकर जांभळे, राजश्री राजेंद्र म्हशीलकर, शीतल निलेश जांभळे, अनिता अनंत जांभळे, मनीषा गंगाराम जांभळे, रोहिणी चंद्रकांत जांभळे आदींनी परिश्रम घेतले.

      ओमायक्रोनच्या शासन नियमावलीमुळे यंदा उत्सव सोहळा छोटेखानी स्वरूपात करण्यात आले असून जयंती निमित्ताने होणारी महाराजांची मिरवणूक, समाजातील विद्यार्थ्यांचे गुणगौरव तसेच विशेष सन्मान, महिला मंडळाचे कार्यक्रम आदी कमी करीत केवळ छोट्या स्वरूपात हा जयंतीउत्सव साजरा करीत आहोत, पुढील वर्षी जामगावामध्येच भव्य स्वरूपात जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात येईल असे समाजाचे तालुकाध्यक्ष समीर नागोठकर यांनी यावेळी सांगितले.

Comments

Popular posts from this blog