सुखदरवाडी येथे आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी


रोहा प्रतिनिधी 


      सुखदरवाडी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवजन्मोत्सव सोहळा साजरा झाला.सकाळी गावातील सर्व तरुण तळा येथून शिवज्योत आणून पूजा केली, त्यानंतर महाराजांच्या मूर्तीस अभिषेक व पूजा करण्यात आली. शिवजयंती निमित्ताने आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी, विविध योजनांचे देखील आयोजन केले होते. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


शिवजयंती निमित्त महिला व बालविकास मंत्री नामदार अदिती ताई तटकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शिवस्मारक सुखदरवाडी रंगमंच याचे उद्घाटन नामदार आदिती ताई तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. लेझीम पथकाने आदिती ताईंचे स्वागत करण्यात आले. गावातील दोन लहान भावंडांनी पोवाडा गायन केले.त्यानंतर विरझोली पथकाने शिवकालीन शस्त्र चालवणे,असे विविध कार्यक्रम सादर केले.ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले. 

       गावातून मशाल, पालखी घेऊन ढोल ताश्याच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. तरुण,तरुणीने मिरवणूक आनंदाने लेझीम खेळत उत्साहात पार पडली. रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. लहान मुलांनी मोठ्या हौसेने त्याच्यात सहभाग घेतला होता. सांस्कृतिक कार्यक्रमाने संपूर्ण शिवजयंती कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी मदत करणाऱ्यांचे देखील सत्कार करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शिवजयंतीचा संपूर्ण दिवस हा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला यात सुखदरवाडी ग्रामस्थ,महिला,लहान मुलं, तरुण, तरुणी,मुंबईकर मंडळ यांनी उत्साहाने कार्यक्रम साजरा केला. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले.


Comments

Popular posts from this blog