तळा तालुका शेतकरी संघटना संवाद बैठक संपन्न


तळा कृष्णा भोसले

         तळा तालुक्यातील शेतकरी संघटनेने, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज याना हार घालून विविध शासकीय कार्यालयांना भेटी देऊन विविध शेतकऱ्यांच्या साठी योजना  जाणून घेऊन शेतकरी व प्रशासन यांच्या मधील दुवा बनून शेतकरी संघटना प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. शेतकरी संघटनेचे सचिव श्री कैलास मुकुंद पायगुडे प्रस्तावना मांडून चर्चेला सुरुवात केली.


        नायब तहसीलदार पालांडे साहेब यांनी तहसील कार्यालयाचे विविध योजनांची उपयुक्त माहिती सांगितली ,आणि त्याचे लागणारे कागद पत्र याची पण माहिती सांगितली.ज्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना त्याचा चागंला लाभ होईल.तसेच त्यांनी सांगितले की माननीय तहसीलदार स्वाती पाटील यांच्याशी बोलून लवकरच प्रशासन व शेतकरी संघटना यांच्या संयुक्त पणे शासनाच्या विविध योजनांचा शिबिर तहसील कार्यालयात प्रांगणात  लावण्यात येईल असे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.त्याचे शेतकरी संघटनेने स्वागत केले व त्यांचे आभार मानले.

          गटविकास अधिकारी यांच्याकडे म्हसळा तालुका येथील अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे ते हजर नव्हते. त्यांच्या वतीने कृषी विभागाचे मुख्य अधिकारी सोंडकर साहेब यांनी पंचायत समिती मधील असणाऱ्या व् विविध योजनांची महितीही दिली.मग ते मनरेगाची असतील किंवा शेती विषयक असतील.यांची सविस्तर माहिती दिली.शेतकऱ्यांनी असणाऱ्या शंका उपस्थित केल्या, त्यांच्या शंकेचे निरसन करून खूप चांगली माहिती दिली.  पुढे शेतकऱ्यांना चांगली मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. 


        पशु विभागाचे डॉ. रघुनाथ पवार यांनी विविध योजना म्हणजेच मनरेगा व पशु संवर्धन या बाबत  व योजनांची कागद पत्रासह माहिती दिली.शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींना मदत करण्याचे आश्वासन दिले.

     शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष श्री रविशेठ मांडवकर यांनी सर्व अधिकारी वर्ग ,पत्रकार यांचे आभार मानून असेच सहकार्य करण्याची विनंती करून तेथील कार्यक्रम संपला असे जाहीर केले.तालुका कृषी विभागात गेलो आसता.तालुका कृषी अधिकारी उरण येथे स्पोर्ट्स निमित्ताने गेले होते. कृषी अधिकारी यांच्याशी VC द्वारे शेतकरी संघटनेने संवाद साधून चर्चा केली. कृषी अधिकारी यांनी आश्र्वशीत केले की मी शेतकरी संघटनेची बैठकीचे आयोजन करीत   विविध कृषीच्या योजना व त्यांचे कागद पत्र यांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली जाईल. शेतकरी आणि कृषी विभाग एकमेकाच्या हातात हात घालून करेल. 

 शेतकरी संघटनेने कृषी अधिकारी कांबळे  यांचे आभार मानले.नगरपंचायतीचे नगराध्यक्षा सौ.माधुरी शैलेश घोलप मॅडम,उपनगराध्यक्ष श्री चंद्रकांतजी रोडे यांनी शेतकरी संघटनेचे स्वागत केले. व आपली माणस भेटल्याचा आनंद व्यक्त केला. शेतकरी संघटनेने विनंती केली की नगरपंचायती मध्ये नगरपंचाती मधील शेतकऱ्यांना कृशीच्या व मनरेगेच्या योजनेचा लाभ घेता येत नाही .तरी आपण आपल्या नगरपंचायती अंतर्गत  लाभ मिळावा.


     उपनगराध्यक्ष श्री चंद्रकांतजी रोडे यांनी आश्वासीत केले की मुख्याधिकारी व कृषी विभाग यांच्याशी संबधीत माहिती घेऊन लवकरात लवकर या योजना चालू करून शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल. त्याबद्दल शेतकरी संघटनेने त्यांचे आभार मानले. पुढील कार्यालयांना  तारीख  ठरवून भेटी देण्याचे ठरले.

या संवाद बैठकीला उपस्थित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत राऊत, उपाध्यक्ष रवींद्र मांडवकर, सचिव कैलास पायगुडे, नगरसेवक नरेश सुर्वे, सिराज खाचे ,पत्रकार पिंगळे मॅडम, पत्रकार  किशोर पितळे ,नामदेव साळवी,गणेश राणे,नामदेव काप,नितीन साळवी,कृष्णकांत मानकर,लक्ष्मण तांबे, कानु विचारे,तुकाराम बटावळे, जनार्दन पांढरे,अशोक राणे,नरेंद्र लोखंडे, भानू मनचेकर,मुल्ला, कानु विचारे, कृष्णा चाळके, किरण मानकर, सोलम, महमद परदेसी,राम सावंत,यासारखे अनेक मान्यवर सदस्य व मोठ्या प्रमाणात शेतकरी हजर होते.

Comments

Popular posts from this blog