शिवमुद्रा मित्र मंडळ गावठण येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी 


रोहा प्रतिनिधी 


        शिवमुद्रा मित्र मंडळ गावठण हे प्रत्येक सण, उत्सव मोठ्या उत्साहाने आणि थाटामाटाने साजरे करतात.या वर्षी देखील शिवजयंती त्याच जल्लोषात साजरी केली. दि.१८ फेब्रुवारी रोजी सकाळी मशाल आणण्यासाठी अवचितगडाकडे प्रस्थान केले. दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी मशाल आगमन झाले. नंतर मशाल पूजन व मूर्तीचे मनोभावे पूजन करण्यात आले.

         सायंकाळी कुमारी सिद्धीताई सुरेश पवार रा. गोवे हिचे शिवव्याख्यान झाले.कमी अगदी लहान वयात खणखणीत आवाजात तिने शिवविचार सांगितले तिच्या विचाराने आणि आवाजाने संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला. त्या अगोदर गावातील लहान मुलींच्या भाषणाने सर्वांचे मन जिंकले. सिद्धीताई पवार यांचे सन्मान मंडळाचे सचिव श्री. सागर सानप यांनी केले. व्याख्यान नंतर महाराजांची पालखी मिरवणूक वाजत गाजत पारंपरिक नृत्य करून अतिशय उत्साहात पार पडले. सर्व ग्रामस्थ, महिला व तरुण मंडळ सहभागी झाले होते.

गावातील सर्व महिला व मुली यांच्या पारंपरिक वेशभूषेने सर्वांचं लक्ष वेधले.

शेवटी महाराजांची महाआरती झाली व कार्यक्रमाची सांगता झाली.असे मंडळाचे सल्लागार श्री दत्ता सानप यांनी सांगितले व सर्वांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog