तळा येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाअंतर्गत उदया होणार विविध शासकीय योजनांचा लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ वाटप पत्र
उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत व महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांचे शुभहस्ते होणार उद्घाटन खा. सुनिल तटकरे व आ. अनिकेत तटकरे यांची विशेष उपस्थिती लाभणार!
तळा कृष्णा भोसले.
तळा तालुका स्तरीय शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ वाटप पत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तळा येथील गो. म. वेदक हायस्कूल समोरील भव्य प्रांगणात रविवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, महीला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांचे शुभ हस्ते होत असून प्रमुख अतिथी रायगड चे खा. सुनील तटकरे, विधानपरिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांची विशेष उपस्थितीत लाभणार असुन या कार्यक्रमाला तालुक्यातील नागरिकांनी, लाभार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या कार्यक्रमासाठी प्रांताधिकारी संदीपान सानप यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार स्वाती पाटील, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, सहाय्यक पोलीस अधिकारी गणेश कराड, तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे, तळा नगरपंचायत प्रभारी मुख्याधिकारी विराज लबडे व सर्व शासकीय कर्मचारी लक्ष ठेवून काम करताना दिसत आहेत.
Comments
Post a Comment