राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना म्हसळा आणि कोकण युवा प्रतिष्ठान म्हसळा यांच्या वतीने १२ वी च्या परीक्षार्थीना पेनाचे वाटप


म्हसळा -प्रतिनिधी 

             खासदार सुनील जी तटकरे साहेब आणि महिला व बालकल्याण मंत्री अदिती ताई तटकरे आणि विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे यांचे सर्वांचे प्रयत्नाने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस म्हसळा शहर अध्यक्ष शाहनवाज उकये यांच्या संकल्पनेतून उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा २०२४ इयत्ता १२ वी च्या परीक्षार्थीना पेन भेट देऊन शुभेच्छा देत प्रोत्साहित करण्यात आले. हे पेन नसुन विद्यार्थ्यांच्या भविष्याचे छोटस शस्त्र आहे. अंजुमन हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्राचार्य अब्दुल रहिमान घराडे सर, कोकण युवा प्रतिष्ठानचे  संस्थापक अकमल अस्लम कादिरी,नवाझ नझिरी, मनोहर तांबे, नदीम दफेदार, अभय कळमकर, इमरान दरोगे,असीम चोगले, अनस हसपाटील, इरशाद खान, यांच्यासह राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सर्व सदस्य, शिक्षक वर्ग या वेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog