पी.एम किसान अंतर्गत गाव पातळी वरील विशेष मोहिम

प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी तळा कृषी विभागाचे प्रयत्न


तळा कृष्णा भोसले

           शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणा-या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजनेच्या संपृक्तता (Saturation) साध्यतेसाठी तालुक्यात डिसेंबर ते जानेवारी, २०२४ या कालावधीत राबविलेल्या मोहिमेत तालुक्यातून १२३  स्वयं नोंदणीकृत शेतक-यांची नव्याने नोदणी करण्यात आली, तथापि, तालुक्यात एकुण ५१५ शेतक-यांनी योजनेच्या लाभासाठी आवश्यक इतर सर्व बाबींची पूर्तता केलेली असून त्यांचे केवळ ई-केवायसी करणे बाकी आहे. अशा शेतक-यांचे मुख्यतः सामाईक सुविधा केंद्रांमार्फत (CSCs) eKYC प्रमाणिकरण करण्यासाठी दि. १२ फेब्रुवारी ते दि. २१ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत आणखी १० दिवसांची संपृक्तता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेची क्षेत्रीयस्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी ग्रामस्तरीय नोडल अधिकारी (VNOs) यांना निर्देश दिले आहेत. या मोहिमे दरम्यान केवळ eKYC प्रमाणिकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या नजिकचे सामाईक सुविधा केंद्र व ग्राम स्तरीय नोडल अधिकारी (VNOs) यांचे मार्फत eKYC प्रमाणीकरण पूर्ण करावे. शेतकऱ्यांनी स्वतःचे ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओटीपी, सामाईक सुविधा केंद्र, पी. एम. किसान फेस ऑथेंटिकेशन अँप या सुविधांपैकी कोणत्याही एका सुविधेचा वापर करावा.

          पी. एम. किसान योजने अंतर्गत ई-केवायसी प्रमाणिकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर असणे आवश्यक आहे. तालुक्यातून बँक खाती आधार संलग्न करणे बाकी ७२७ शेतकरी आहेत या  शेतकऱ्यांनी आपल्या सोईनुसार प्राधान्याने नजीकचे पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे. केंद्र शासन पी. एम. किसान योजनेचा १६ वा हप्ता माहे फेब्रुवारी. २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात वितरीत करणार आहे. तसेच पी. एम. किसान योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थीनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा होईल. यास्तव या दोन्ही योजनांच्या लाभासाठी दिनांक २१ फेब्रुवारी, २०२४ पर्यंत आवश्यक बाबींची पूर्तता या मोहिमे दरम्यान करावी असे आवाहन तालुक्यातील शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजिकचे कृषी सहाय्यक/कृषी पर्यवेक्षक/मंडळ कृषि अधिकारी/तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.

Comments

Popular posts from this blog