तळा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना मेळावा संपन्न


तळा- किशोर पितळे 

          तळा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना मेळावा व ११ वा वर्धापन दिन श्री गणेश मंगल कार्यालय येथे ९ फेब्रुवारी २४ रोजी सकाळी११वा.मा.श्रीम.शोभा म. भागवत यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष मा. धुरंधर मढवी सरचिटणीस एम पी वावेकर, कोषाध्यक्ष सुरेंद्र जाधव, पाटील, काशिनाथ जाधव, कर्णीक सर मुरूड अध्यक्ष तालुका अध्यक्ष भा.स.मंचेकर, उपाध्यक्ष बाळाराम चव्हाण अनंत वारे गुरूजी होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व श्रीगणेश प्रतिमेचे पुजन करण्यात आले.संघटनेचे प्रवर्तक कै.नारायणराव वेदक व मयत सदस्यांना भावपुर्ण आदरांजली वाहिली.स्वागत गीत अरविंद जंगम यांनी करुन मान्यवरांना शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. अध्यक्ष भानू मंचेकर यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा लेखा जोखा व आर्थिक परिस्थिती सादर करून सेवानिवृत्त संघटना गेली ११ वर्ष उत्तम रितीने काम करीत असून अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात यशस्वी झालो आहोत.नियमित सभा घेऊन सभासदांच्या सेवानिवृत्ती वेतनामधील अडी अडचणीचा पाठपुरावा करून सोडविण्यासाठी प्रयत्न केला जातो. आवश्यकता वाटल्यास जिल्हा संघटनेच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न केला जातो असे सांगितले. संघटना स्थापन वेळी ३५ सदस्य होते आज ७५ सदस्य झाले आहेत. सदस्यांच्या पाल्य विषेश प्राविण्य गुणवंत विद्यार्थांचा गौरव केला जातो. सदस्यांचा वाढदिवस देखील साजरे केले जातात.संघटनेत कोणत्याही प्रकारचे वादविवाद नाही तर सुसंवाद अधिक आहे थोरांंपासून लहानापर्यंत सर्वांना सामावून घेतले जाते. त्यामुळे संघटनेला बळ येते.सभासदसंख्या वाढली पाहिजे. छोटा तालुक्यात दोन संघटना असणे योग्य नाही त्यासाठी प्रयत्न करून त्या संघटनेचे सदस्य या संघटनेत सामील झाले.त्यांचे स्वागत आहे. संघटना वाढणे आवश्यक आहे असे मत मारूती शिर्के यांनी व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष मढवी म्हणाले की ६ वा ७ वा वेतनवाढ वेतन श्रेणी याची पध्दती, व शंका निरसन करून जिल्हा कार्यकारिणी, राज्य कार्यकारीणी सरकारकडे संघटनेच्या असणाऱ्या समस्या मांडून न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असते.त्यामुळे बरेच प्रश्न सोडवले जातील असे सांगून सभासद संख्या वाढीसाठीचे आवाहन केले.

     श्रीम.भागवत बाई यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले की संघटने बद्दल जिव्हाळा असला पाहिजे आपल्यासाठी स्थापन केलेली संघटनेतून समस्या दूर होत असतात.हि गरज असते.यावेळी अ.वि.जाधव, काशिनाथ जाधव यांनी अनेक समस्याचे केलेले निराकरण करून सदस्यांना न्याय मिळवून दिल्याचे दाखले देऊन वेतन आयोगाचे नियम व स्लॅब पध्दती अतिशय सुलभ पध्दतीने समजून सांगितले.तसेच कर्णिक सर, सुरेंद्र जाधव यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनंतवारे गुरुजी यांनी केले कमळाकर चोरगे यांनी आभार व्यक्त केले.या मेळाव्यात तालुक्यातील अनेक सभासद उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog