निरंकारी चैरिसंतटेबल फाउंडेशन तर्फे ‘प्रोजेक्ट अमृत”चे देशभरात आयोजन

चोरवली येथे रा.जि.प शाळेजवळ राबविण्यात आले स्वच्छ जल, स्वच्छ मन अभियान


जल परमात्म्याचे वरदान आहे आपण त्याचे अमृता प्रमाणे रक्षण करावे 

सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज


तळा : कृष्णा भोसले. 

       सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेखाली रविवारी सकाळी 8.00 वाजता ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ परियोजनेच्या द्वितीय टप्प्याचा शुभारंभ यमुना नदीचा छठ घाट, आई.टी.ओ. दिल्ली येथून करण्यात आला. बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या दिव्य शिकवणूकीच्या प्रेरणेतून साकारलेली ही परियोजना भारतवर्षातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील 1 हजार 533 ठिकाणी एकाच वेळी राबविण्यात आली ज्यामध्ये 11 लाखाहून अधिक स्वयंसेवकांनी भाग घेतला.

       प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल, स्वच्छ मन ही परियोजना चोरवली येथील सार्वजनिक विहीर व नाळा चोरवली रा. जि .प शाळे जवळ राबविण्यात आली. या कार्यक्रमामध्ये चोरवली ब्रांच मुखी गणेश राणे जी , ग्रामस्थ अध्यक्ष मधुकर अंबावले  तसेच निरंकारी सेवादल अन्य निरंकारी भक्तगणांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. सरकारी अधिकारी, प्रतिष्ठित नागरीक व जनसामान्यांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.

    दिल्ली येथे ‘प्रोजेक्ट अमृत’च्या द्वितीय टप्प्याच्या आयोजन प्रसंगी निरंकारी राजपिता रमितजी यांनी सद्गुरु माताजींच्या आशीर्वचनापूर्वी आपल्या संबोधनामध्ये म्हटले, की बाबा हरदेव सिंहजी यांनी आपल्या जीवनात आम्हाला हीच प्रेरणा दिली, की सेवा ही निष्काम भावनेनेच व्हायला हवी. त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रशंसेची इच्छा नसावी. आपण स्वत:चे आंतरिक परिवर्तन घडवून आणण्याकडे लक्ष केंद्रीत केले, तर त्यातून समाज व जगाचे परिवर्तन घडून येऊ शकेल. खरं तर स्वच्छ आणि निर्मळ मनातूनच सात्विक परिवर्तनाचा उगम होतो. 

     सद्गुरु माताजींनी “प्रोजेक्ट अमृत” प्रसंगी उपस्थित सेवादार व समाजातील विविध घटकांतून आलेल्या प्रतिनिधींना संबोधित करताना आपल्या पावन आशीर्वचनामध्ये सांगितले, की आपल्या जीवनात पाण्याला फार महत्व आहे, जल हे अमृतासमान होय. जल आपल्या जीवनाचा मुलभूत आधार आहे. परमात्म्याने आपल्याला ही जी स्वच्छ व सुंदर सृष्टी बहाल केली आहे तिची देखभाल करणे आपले कर्तव्य आहे. मानवी रूपातच आपण या अमूल्य अमानतीचा दुरुपयोग करुन ती प्रदूषित केली आहे. आपण प्रकृतीला तिच्या मूळ रुपात प्रतिष्ठापित करुन तिची स्वच्छता करायला हवी. हे आपण आपल्या कर्मातून सांगायला हवे, केवळ शब्दांतून नव्हे. कणाकणात व्याप्त परमात्म्याशी जेव्हा आपले नाते जोडले जाते आणि आपण याचा आधार घेऊ लागतो तेव्हा याच्या रचने वरही आपले प्रेम जडते. आपण या जगात आलो आहोत तर या धरतीला आणखी सुंदर रुपात सोडून जाण्याचा आपला प्रयास असायला हवा. 

     यमुनेच्या तीरावर आयोजित मुख्य कार्यक्रमात ‘आओ संवारे, यमुना किनारे’ (चला सावरू यमुनेचे तीर) या मुलभूत संदेशातून या परियोजनेने एक जनजागृतीचे रूप धारण केले. या प्रसंगी संत निरंकारी मिशनचे समस्त अधिकारी गण मान्यवर अतिथी तसेच हजारोंच्या संख्येने स्वयंसेवक व सेवा दलाचे सदस्य सहभागी झाले.  कार्यक्रमाचे थेट प्रसारण संत निरंकारी मिशनच्या वेबसाईटवर करण्यात आले ज्याचा लाभ देश-विदेशातील भाविक भक्तगणांनी घेतला. या कार्यक्रमात दिल्ली विश्वविद्यालयातील हजारो विद्यार्थी व शिक्षक यांच्यासह अनेक संस्थांचे प्रतिनिधी व पर्यावरण संरक्षणाशी संबंधित अनेक मान्यवर अतिथींनी भाग घेतला. भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाचे प्रतिनिधीही या कार्यक्रमात सहभागी झाले.

       कार्यक्रमाचे समापन झाल्यानंतर सहभागी झालेल्या अतिथी गणांनी मिशनची अत्यधिक प्रशंसा केली आणि सद्गुरु माताजींचे मनापासून आभार व्यक्त करत प्रकृती रक्षणार्थ निश्चितपणे एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे, अशी पुस्तिही जोडली.

Comments

Popular posts from this blog