नागपूर येथे झालेल्या स्पेशल ऑलिंपिक जलतरण स्पर्धेमध्ये श्रेयस ने पटकावले सुवर्णपदक 


रोहा- शैलेश गावंड 


मेढा येथील कविवर्य श्री नारायण पराडकर यांचे नातू आणि श्री.दिपक पराडकर यांचे चिरंजीव श्रेयस याने नागपूर येथे झालेल्या राज्य स्तरीय  स्पेशल ऑलिंपिक मध्ये जलतरण स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.

नागपूर येथे दिनांक 30 आणि 31 जानेवारी 2024 दरम्यान झालेल्या राज्य स्तरीय स्पेशल ऑलिम्पिक - भारत या स्पर्धेत कु.श्रेयस दिपक पराडकर याने स्विमिंग स्पर्धा 25 मीटर आणि 50 मीटर या स्पर्धेत प्रत्येकी सुवर्ण पदक पटकावले.

एकूण दोन सुवर्ण पदकाचा मानकरी ठरलेला कु. श्रेयस दिपक पराडकर याने 28 जिल्ह्यातुन स्विमिंग स्पर्धेसाठी आलेल्या सर्व स्पेशल स्विमिंग स्पर्धकांमध्ये पहिला क्रमांक मिळवून रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

आता तो स्पेशल नॅशनल ऑलिम्पिक स्विमिंग स्पर्धेची तयारी करत असून पुढील दोन महिन्यात ती नॅशनल ऑलिम्पिक स्पर्धा गुजरात , पौंडेचरी किंवा मुंबई अंधेरी येथे होणार आहे जिथे की सर्वच राज्यातुन पात्र असलेले स्पेशल स्विमिंग स्पर्धक येणार आहेत.

स्पेशल नॅशनल ऑलिम्पिक स्पर्धेत कु. श्रेयस दिपक पराडकर याने असेच भरघोस यश संपादित करावे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे नाव स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धेत मोठे करून 2027 मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पेशल स्विमिंग स्पर्धेत आपल्या देशाचे नाव सुध्दा मोठे करावे यासाठी कु.श्रेयस दिपक पराडकर यास मनःपूर्वक शुभेच्छा  आणि अभिनंदनचा वर्षाव सर्व स्तरातून होत आहे

या स्पर्धेसाठी कु. श्रेयस दिपक पराडकर याची आई सौ. वृषाली दिपक पराडकर यांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे.

Comments

Popular posts from this blog