रायगड जिल्हा परिषदेचा ODF PLUS चा पहिला बहुमान तळा तालुक्याला

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांच्या हस्ते गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांनी स्विकारला


तळा कृष्णा भोसले.  

       रायगड जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता मिशन. या अंतर्गत रायगड जिल्हा परिषद मधुन जिल्ह्यातील तळा तालुक्याला ODF PLUS चा पहिला बहुमान मिळाला आहे. 


    रायगड जिल्हा परिषद येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांचे शुभहस्ते १ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या कार्यक्रमात तळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांनी तालुक्याच्या वतीने स्विकारला आहे. यावेळी श्रीमती शुभांगी नाखले  प्रकल्प संचालक   तथा  उपमुख्य कार्यकारी ( पाणी व स्वच्छता), श्रीमती प्रियदर्शिनी मोरे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रायगड जिल्हा परिषद अलिबाग व इतर मान्यवर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दिलेल्या प्रशस्तीपत्रात त्यांनी ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचविण्यासाठी केन्द्र व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण) या राष्ट्रीय योजनेची अंमलबजावणी दरवर्षी केली. मात्र या अभियानांतर्गत आपल्या मुल्यांची सर्व गावामध्ये शाश्वत स्वच्छता सुविधा निर्माण करुन संपूर्ण तालुका हागणदारीमुक्त अधिक केल्याबद्दल विशेष अभिनंदन करत असल्याचे म्हटले आहे. 

   त्याचबरोबर या प्रतिक्रियेत सहभागी सहाय्यक गटविकास अधिकारी, अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत) सरपंच, ग्रामसेवक, गट समन्वयक, या सर्वांचे योगदान लाभले त्यामुळे तालुका हागणदारीमुक्त अधिक करण्यासाठी आपण सर्वांनी स्वयंप्रेरणेने दिलेल्या योगदानाबद्दल हे प्रशस्तीपत्र सर्वाना प्रदान करीत आहोत असे म्हटले आहे. 

    यामुळे तालुक्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, महीला मंडळे, युवक, शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या प्रयत्नाने केलेल्या योगदानाबद्दल व मिळालेल्या या प्रशस्तीपत्रामुळे तालुक्याची मान अधिक  उंचावली आहे.

Comments

Popular posts from this blog