तळा तालुक्यातील वाशी हवेली गावाला " स्वप्नातील गाव " मानांकन


तळा- कृष्णा भोसले. 


        दि.२१ फेब्रुवारी २०२४ रोजी वाशी कोळीवाडा येथे स्वदेश फाउंडेशन मार्फत स्वप्नातील गाव हे मानांकन मिळालेला आहे. पण या मानांकनासाठी गेली पाच वर्ष म्हणजेच गाव विकास समिती वाशी हवेली कोळीवाडा याची स्थापना २४ जुलै २०१९  साली व तेथून जवळ जवळ पाच वर्ष म्हणजेच स्वच्छ सुंदर स्वास्थ्य, सक्षम साक्षर स्वावलंबन या सर्व बाबींवर वाशी हवेली कोळीवाडा येथे काम करण्यात आले.तरी गावातील गटारे उघडे होती ते शंभर टक्के बंदिस्त केली तसेच गावात शंभर टक्के सीसीटीव्हीच्या कक्षेत गाव आहे तसेच १३७ घरांना ग्रामपंचायत मार्फत सुका कचरा व ओल्या कचऱ्यासाठी डस्टबिन देण्यात आलेले आहेत. तसेच वाशी हवेली ग्रामपंचायत मार्फत १३७ घरांना डिस्पेन्सर देण्यात आलेले आहेत तसेच फाउंडेशन मार्फत प्रत्येक घरावर सोलर लाईट देण्यात आलेले आहे.


              तसेच शंभर टक्के लोकांकडे शौचालय आहेत व ते शौचालयाचा वापर करतात त्याच्यामुळे हागणदारी मुक्त गाव आहे. तसेच शंभर टक्के शोष खड्डे आहेत तरी गावातील सर्व बाबींवर चांगल्या प्रकारे काम करून यावेळी कोळीवाडा यांनी दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ या दिवशी स्वप्नातील गाव हा मानांकन मिळवला आहे. तरी या मानांकनासाठी उपस्थित स्वदेश संचालक श्री प्रसाद पाटील सर तसेच साठे सर तसेच तळा व्यवस्थापक राकेश मोरे सर तसेच होते समन्वयक सागर पाटील व सर्व स्वदेश कर्मचारी तसेच या कार्यक्रमाला उपस्थित माजी समाज कल्याण सभापती गीता ताई जाधव तसेच नगरपंचायत उपाध्यक्ष श्री रोडे साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळा तालुका अध्यक्ष श्री नानासाहेब भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला अध्यक्ष सौ जानवी ताई शिंदे तसेच तसेच गाव विकास समितीतील तळा तालुक्यातील सर्व महिला मंडळ व पुरुष मंडळ मंडळ व पुरुष मंडळ तसेच तेरा गावातील कोळी समाजातील महिला मंडळ व पुरुष मंडळ तसेच माजी सरपंच श्री ज्ञानदेव तांडेल तसेच सरपंच श्री जगन्नाथ पार्वती ज्ञानदेव तांडेल व उपसरपंच भारती भानाजी तांडेल तसेच ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ व मुंबईकर मंडळ  कोळी समाज अध्यक्ष व उपाध्यक्ष खजिनदार तसेच सर्व पंच कमिटी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog