रोहा येथे कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रोहाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 


रोहा प्रतिनिधी 


       धावीर देवस्थान ट्रस्टचे जेष्ठ पदाधिकारी सन्माननीय श्री. मकरंदभाऊ बारटके यांच्या उपस्थितीत मराठी राजभाषा दिन उत्साहात पार पडला. संत ज्ञानेश्वर माउलींच्या पसायदानाचे मराठी भाषेतील महत्व अतिशय सोप्या शब्दात मकरंदजींनी उपस्थितांना सांगितले.


      दुर्ग अभ्यासक, लेखक, रायगड भूषण सुखद राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषा शुद्धीकरणासाठी घेतलेली भूमिका उपस्थितांना विशद केली.


     शाखा अध्यक्षा संध्या दिवकर यांनी कोकण मराठी साहित्य परिषद रोहा शाखेच्या कार्याचा आढावा आपल्या प्रास्ताविकात घेतला. उपाध्यक्षा आरती धारप यांनी वि. वा. शिरवाडकरांच्या साहित्य प्रवासाचा थोडक्यात आढावा घेतला.

      मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास निवृत्त नायब तहसीलदार शरद पोकळे, सौ. पोकळे, कोलाड हायस्कुलचे शिक्षक सदानंद तांडेल, मंगलवाडी शाळेच्या शिक्षिका स्नेहा तांडेल, पुगाव हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री निवास थळे, अष्टमीच्या रिद्धी बोथरे आदी मान्यवर उपस्थित होते.


      कोकण मराठी साहित्य परिषद रोहा शाखेचे  संजीव शेरमकर, ज्योती शिंदे, मानसी चापेकर, विजय दिवकर, अजित पाशीलकर, नेहल प्रधान, शरद कदम, स्वराज दिवकर, चेतन बारसकर यांनी कवितांचे उत्तम सादरीकरण केले.

      आपल्या ओघवत्या शैलीत भारत चौधरी यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच विशेष परिश्रम घेणाऱ्या सचिव विजय दिवकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडला.


Comments

Popular posts from this blog