शेडसई ग्रामपंचातीवर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा झेंडा 


रोहा प्रतिनिधी 


                        मा.खासदार श्री.सुनीलजी तटकरे साहेब,मा.आमदार श्री.अनिकेत भाई तटकरे ,महिला व बाल कल्याण मंत्री मा.कु.अदिती ताई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा शेडसई ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा फडकवला. या वेळी सरपंच पदी सौ.कल्याणी कृष्णा मढवी तर उपसरपंच पदी सौ.राजश्री राजन पाटील यांची ६ पैकी ४-४ मतांनी निवडून आल्या .या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचे सर्व ग्रामस्थ, विशेषत: महिला वर्गानी अभिनंदन केले. सरपंच, उपसरपंच या दोन्ही पदी महिला निवडून आल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण झाले आहे.

                यावेळी श्री.संतोष भोईर,श्री.विठोबा गुंड, श्री.नामदेव मढवी, श्री. सुभाष दिवकर ,श्री.प्रभाकर कडू, श्री.दीपक कडू, श्री.ज्ञानेश्वर कोळी,माजी उपसरपंच सौ.प्राजक्ता कडू,शेडसई गाव अध्यक्ष चंद्रकांत गायकर,माजी उपसरपंच श्री.जयराम गायकर,सदस्य श्री.मंगेश कोटकर,कु.जयेश कडू श्री.कृष्णा मढवी,श्री.राजन पाटील, श्री.ओमकार कडू,श्री.महेश कडू,श्री.काशिनाथ मांडलेकर ,महिला विभाग संघटिका सौ.वृषाली कडू,सौ.गीता कडू,सौ.योगिनी संगम,सौ.नाजूक कडू,सौ.पुष्पा कडू,सौ.शुभांगी साळुंखे इत्यादी ग्रामस्थ व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog