तळा तालुक्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमाला नागरीकांचा अभुतपूर्व प्रतिसाद
महिला व बालकल्याण मंत्री ना. अदिती तटकरे यांचे हस्ते विविध योजनांचे लाभार्थी प्रमाण पत्र वाटप .
तळा- कृष्णा भोसले.
तळा तालुक्यातील शासन आपल्या दारी या द. ग. तटकरे कॉलेजच्या झालेल्या प्रांगणात तालुक्यातील लाभार्थी व नागरीकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून अभुतपूर्व प्रतिसाद नोंदवला. त्यामुळे या कार्यक्रमाला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
सुरवातीला उभारलेल्या स्टॉलला मंत्री अदिती तटकरे यांनी भेट दिली. बचत गट, विविध शासकीय विभागाने योजनांची उभारलेल्या स्टॉलला भेटी व माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. त्यानंतर दीपप्रज्वलन करुन महाराष्ट्र गीत विदयार्थीनी गायले त्याचा सन्मान ठेवत नागरीकांनी उभे राहून गीत गायले. उपस्थित मान्यवरांचा शाल श्री फळ देत स्वागत करण्यात आले.
यावेळी शेकडो लाभार्थींना महसुली विभाग, पंचायत समिती विभाग, कृषी विभाग, यांच्या विविध योजना त्यामध्ये घरकुल, अपंग व्यक्तींना,शेतकरी, मागासवर्गीय विभागाच्या अशा विविध योजनांच्या लाभार्थींना प्रमाणपत्र, चेक वाटप, मंत्री ना. अदिती तटकरे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी माणगांव प्रांताधिकारी संदिपान सानप, तहसीलदार स्वाती पाटील, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, तळा नगराध्यक्षा माधुरी घोलप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, माजी सभापती नाना भौड, राष्ट्रवादी काँग्रेस प्रांत महीला अध्यक्षा सायली दळवी, हिराचंद तांबे, नगरसेवक, सरपंच प्रविण आंबर्ले, कृषी मडंळ अधिकारी सचिन जाधव, पंचायत समिती पशुधन अधिकारी डॉ. रघुनाथ पोवार, ग्रा. पं. अधिकारी, पं.स.पुष्पा नेरकर, पं. स. कर्मचारी, महसूल कर्मचारी, सर्व विभागाचे शासकीय कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी शांततेत चोख बंदोबस्तात पार पाडण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा सज्ज होती. कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध व शांततेत पार पडला.
Comments
Post a Comment