लोकसभेची रायगडची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच असल्याचे दिले संकेत-उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
तळा-किशोर पितळे
तळा शहराच्या १३ कोटी ७० लक्ष रू.खर्चाच्या पाणी पुरवठा प्रकल्पाचे भूमिपुजन सोहळा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात १७ फेब्रु.२४रोजी पार पडला. तळा नगर पंचायत हद्दीतील मोठ्या लोकवस्तीच्या नागरीकांना पिण्याचे मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने खासदार सुनिल तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरे यांच्या विशेष प्रयत्नाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियान अंतर्गत तळा शहरासाठी खास करून १३ कोटी ७० लक्ष इतक्या मोठ्या रकमेच्या निधीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते मोठ्या थाटात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तळा हायस्कूलच्या समोरील मैदानात खासदार सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या स्वागत आणि पक्ष मेळावा कार्यक्रमाला पक्षाचे राष्ट्रिय नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीच्या माध्यमातुन खासदारकीच्या सर्वच्या सर्व ४८ जागा निवडून आणुन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान करायचे आहे.
राज्यात लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने महायुतीच्या माध्यमातुन निवडणूका लढवल्या जातील आणि त्यात रायगडची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच असणार आहे आणि ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे हेच उमेदवार असतील असे ठणकावून सांगितल. छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची राजधानी असलेला रायगड जिल्हा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा अतुट असा नातं आहे. युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन शाहु,फुले डाॅ.आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रायगड जिल्ह्यात खंबीरपणे उभा आहे.लोकप्रतिनिधी खमका असला तर विकासाचे सर्व प्रश्न सुटतात.आमदार म्हणून काम करताना सत्ताधारी पक्षाचा असल्याने जादा निधी दिला जातो असे काही नाही.विरोधकांना मिळत नाही असे नाही यावर भाष्य करताना येथील जनतेला खासदार सुनिल तटकरे,आमदार मंत्री आदिती तटकरे ,आमदार अनिकेत तटकरे हे विकास कामांत खमके लोकप्रतिनिधी लाभले आहेत.कामांत त्यांचा सतत पाठपुरावा असतो.
विकास कामांसाठी निधीची कुठेच कमतरता पडणार नाही असे आश्वासन दिले. नगर पंचायतीच्या प्रशासकिय इमारतीला ८ लक्ष रु. निधी मंजूर केला.राज्यात महायुतीची सत्ता असताना गुण्या गोविंदाने कामे करा खेकडा वृत्ती मला अजिबात आवडत नाही विकासात सर्वपक्षीय सहभाग हवा सद्या राजकारणात आपापसातील भांडणे विकोपाला जातात हे बघीतले आहे राज्यात महायुती असताना स्थानिक पातळीवर राजकारण करू नये असा मार्मिक टोला हाणला.अजिदादांनी पक्षाने देशातील आणि राज्यातील राजकारणात घेतलेला निर्णय आणि परिस्थिती नुसार घ्यावा लागला सत्तेत सहभागी झालो. शिवसेना पक्षात झालेल्या घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांचा आघाडी सरकार पडला आणि जनतेला विकासा पासून वंचीत राहवे लागले.नव्याने मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीत का सहभागी झालो याची कारणे देताना अजितदादांनी मी जे बोलतो ते करतो त्याच्या पेक्षा जास्त फाफटपसारा वाढवत नाही.येथील मतदार संघातील वातावरण लक्षात घेता आम्ही सर्वधर्म समभाव जोपासणारे आणि जनतेच्या शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल याचा पाढा वाचत असताना शेतकऱ्यांना पीक विमा, आर्थिक सहाय्य, शेतीसाठी 0% टक्के व्याजाने कर्ज पुरवठा,वीज,पाणी,रस्ते विकास राज्यांतील महीला आणि मुलींचा मान सन्मान वाढविण्यासाठी एकमेव महीला मंत्री आसलेल्या या मतदार संघाच्या आमदार आदिती तटकरे यांच्या प्रयत्नाने चौथे धोरण मंजुर करून ८ लक्ष रुपये पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना मोफत उच्च व तंत्र शिक्षण घेता यावे यासाठी निर्णय घेतला असल्याचे निदर्शनास आणून दिले.सुनिल तटकरे म्हणाले की तळा तालुक्याच्या विकासासाठी विकास कामे आणण्याचा प्रयत्न करीत असतो. त्या दृष्टीने विकास कामे केली.अजित दादाचे मोठे योगदान मिळत असते महायुतीच्या आघाडीने एकत्र येऊन विकास कामे करु नामदार.अदितीताई म्हणाल्या की दादांचे मोठे झुकते माप विकासासाठी तळेकरांना असते.तसेच तळगड किल्याच्या पर्यटन विकासासाठी सहकार्य करावे अशी विनंती केली.
आयोजीत भव्य कार्यक्रमाला खासदार सुनिल तटकरे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे,जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील, नगराध्यक्षा माधुरी घोलप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे शिवसेना तालुकाप्रमुख प्रघुम्न ठसाळ, शहर प्रमुख राकेश वडके, भाजप प्रदेश सचिव रवी मुंढे,माजी नगराध्यक्षा रेश्मा मुंढे माजी उपनगराध्यक्ष सायली खातू सर्वपक्षीय नगरसेवक, सेविका,कोअर कमिटी सदस्य लिलाधर खातू,मंगेश देशमुख,तालुका महिला अध्यक्षा जान्हवी शिंदे उपस्थीत होते. यावेळी शिवसेना तालुका .प्रमुख ठसाळ यांनी पाणी पुरवठा योजना जन्माला घातल्या पासुनचे वृत्त विषद करुन आज आपल्या माध्यमातून लवकरच पुर्णत्वास जाईल याची खात्री होत असून आभार व्यक्त केले. तालुक्यातील जनता नोकरीसाठी शहरात खेडी ओस पडली गेली आहे.ती रोखण्यासाठी उद्योगधंदे कंपनी कारखाने उभारण्याची महत्वाची मागणी अजित दादांकडे केली.तालुक्यातील विविध मागण्याचे निवेदनातून गिरणे हाल खाडीवर पुल उभारणीसाठी लवकरच प्रयत्न केले जातील व ज्युनियर काॅलेज अनुदानाचा प्रश्र मार्गी लावला जाईल मात्र कारखाने, कंपनी याबाबत कोणतेही भाष्य केले नाही.आयोजीत सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे उपस्थितीत मानवंदना दिली. पोलिस बॅड पथकाच्या सुरेल महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
Comments
Post a Comment