कुणबी समाज सामाजिक उपक्रमाला नेहमीच सहकार्य राहील ; ना. आदिती तटकरे 

पा.रा सानप कुणबी भवन नवीन सभागृहाचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन


कोलाड (श्याम लोखंडे)  


            कुणबी समाजाच्या वेगवेगळ्या उपक्रमांसाठी कुणबी भवन व्हावे अशी मागणी कुणबी समाज बांधव यांनी केली होती. आमदार, लोकप्रतिनिधी असताना निधी देण्यात काही मर्यादा असतात. पण ज्यावेळी सर्वांनी कुणबी भवन बांधकामाचे ठरविले, त्यावेळी खा. तटकरे साहेबांनी एका वर्षात जवळपास तीन आमदारांचा  निधी मंजूर करुन या इमारतीला उपलब्ध करून दिला. कुणबी समाजातील वेगवेगळ्या मान्यवरांच्या पुढाकाराने व लोकप्रतिनिधी यांनी एकत्रितपणे उभारलेली कुणबी भवन या इमारतीमध्ये एक व्हाल, येथील विभागीय ग्रूप करता स्वतंत्र खोल्या त्याच बरोबर विविध उपक्रम राबविले जावे या कार्यक्रमासाठी सामाजिक सभागृह त्यात सामाजिक उपक्रम राबवले जावे, त्यासाठी लागणारे सहकार्य कायम आमचे सर्वांचे राहील असल्याचे प्रतिपादन कुणबी समाज नेते माजी आमदार स्व.पा.रा. सानप कुणबी भवन नवीन सभागृहाचे शुभारंभ महिला व बालविकास मंत्री ना.अदिती तटकरे यांच्या हस्ते  करण्यात आले याप्रसंगी केले.

          संपुर्ण कोकणात सुसज्य असा उभारण्यात आलेल्या कुणबी भवन सभागृहामध्ये कुणबी सामाजातील विद्यार्थी युपीएससी एमपीएससी व्हावे यासाठी समाजाने प्रयत्न करावे, त्यासाठी लागणारा मार्गदर्शन शिबीर, वाचनालय, पोलीस भरतीसाठी लागणारे सहकार्य, पोलीस दलातील मंडळीचे मार्गदर्शन, आयएएस अधिकारी यांचे मार्गदर्शन आदी उपक्रम राबवावे. शिक्षणामध्ये प्राविण्य मिळवलेले विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले तर समाजातून आयपीएस युपीएसी अधिकारी तयार होतील. रोहा तालुक्यातील कुणबी दाखल्यांसाठी बैठक घेऊन कार्यकारिणीनीत चर्चा केली तर दाखल्यांचा प्रश्न नक्कीच सुटेल. असे ना. तटकरे बोलत होत्या. त्या पुढे म्हाणाल्या की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भूमिका असताना कुठल्याही ओबीसी घटकावर अन्याय न होता कुठल्याही प्रचलित आरक्षणाला धक्का न लावता कायद्याचा चौकटीत टिकणारा आरक्षण मराठा समाजाला मिळावे याविषयी नेहमीच भुमिका राहिली आहे. असेही ना. अदिती तटकरे म्हणाल्या.

          यावेळी प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड,  कु.स. उच्चाधिकार समिती मा.अध्यक्ष शंकरराव म्हसकर, जिल्हा समन्वय समिती उपाध्यक्ष शंकरराव भगत , माजी सभापती रामभाऊ सकपाळ, ओ. बी. सी. जिल्हा अध्यक्ष सुरेश मगर, जि. सरचिटणीस, शिवराम महाबळे, मा.  नगरसेवक मयूर दिवेकर, महेंद्र गुजर, महेश कोल्हाटकर, महेंद्र पोटफोडे, रविंद्र चाळके, तालुका कुणबी समाज अध्यक्ष शिवराम शिंदे, दत्ताराम झोलगे, गोपिनाथ गंभे, सुहास खरीवले,मारुती खांडेकर,महेश बामुगडे, सतिश भगत, खेळू ढमाळ, राम करंजे, संदेश लोखंडे, यशवंत हळदे, गणपत रेवाळे, धमेंद्र लाखण, नरेंद्र सकपाळ, दिनेश रटाटे, दिलिप आवाद ,रामचंद्र चितळकर, अनंता थिटे, शशिकांत कडू, विकास खांडेकर, संतोष देवळे, पांडुरंग कडू, दिनेश घरट,सरचिटणीस मंगेश देवकर, रमण कापसे, संजय मांडलुस्कर, तसेच मुंबई कार्यकारीणी सुनिल ठाकूर, उपाध्यक्ष, कु.स.संघ. मुंबई, माधव आग्री, मा. अध्यक्ष कु.स.संघ. मुंबई, शरद गंभे, अध्यक्ष, कु.स. संघ.मुंबई,डॉ. सागर सानप सल्लागार कु.स. संघ. मुंबई, डॉ.मंगेश सानप सहसचिव, कु.स.संघ. मुंबई, सिताराम (बाबू) इप्ते कु.स.संघ. मुंबई ,मनोज शिर्के,महेश भगत, मुकेश भोकटे, गुणाजी पोटफोडे,सह तालुक्यातील कुणबी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

        अभूतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सतीश भगत यांनी केले तर प्रास्तविक तालुका अध्यक्ष शिवराम भाऊ शिंदे यांनी केले तसेच कुणबी समाज नेते सुरेश मगर, शंकर भगत, शंकरराव म्हसकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले तर शेवटी आभार अनंत थिटे यांनी मानून या कार्यक्रमाची सांगता सस्नेह भोजनाची करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog