छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील कथामाला सांगता समारंभ रोहा नगर पालिका मंगलवाडी शाळा क्र.१० येथे संपन्न
आज दिनांक १७ फेब्रुवारी २०२४ रोजी कै.प्रफुलशेठ बारटक्के मंगलवाडी शाळा क्रमांक १० या शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित कथामालेचा सांगता समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभासाठी गड किल्ले अभ्यासक व "इये देशीचे दुर्ग" या पुस्तकाचे लेखक श्री सुखद राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध कथा सांगून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले .इतिहास आणि वर्तमान काळ यांची सांगड घालत आपले जीवन कसे समृद्ध करावे .इतिहासातून आपण काय शिकावे .याचा पाठ श्री सुखद राणे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना सांगितला.तसेच स्वत: लिहीलेले "इये देशीचे दुर्ग" हे पुस्तक विद्यार्थ्यांना वाचनासाठी शाळेला भेट म्हणून दिले.
दिनांक ८/२/२०२४ रोजी कथामाला कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती .छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील विविध कथा जसे त्यावेळचा महाराष्ट्र ,शिवरायांचे बालपण ,रायरेश्वराची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण बांधले, अफजलखानाचा वध ,शाहिस्तेखानाची फजिती ,गड आला पण सिंह गेला ,आग्र्याहून सुटका इत्यादी विविध कथा मंगलवाडी शाळा क्रमांक १० च्या शिक्षिका सौ संध्या विजय दिवकर यांनी दररोज सांगून विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनदर्शन घडवले .
आज या कार्यक्रमाची सांगता मी.सुखद राणे यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली.कार्यक्रमासाठी मंगलवाडी शाळेच्या शिक्षिका सौ.सुचिता टेंगळे मॅडम ,श्री भाऊसाहेब धोत्रे सर ,आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री तुळशीदास कुसळकर सर यांनी विशेष परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment