महिला व बालविकास विभागामार्फत महिलांकरिता साहित्य वाटप ना.अदितीताई तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन


तळा-किशोर पितळे


        एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अलिबाग, महिला व बालविकास विभागा मार्फत आयोजित महिलांकरिता साहित्य वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन मा.नामदार अदितीताई तटकरे महिला बालविकास मंत्री व अलिबाग -मुरुडचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या हस्ते १२ मार्च रोजी करण्यात आले.सदर कार्यक्रमात आमदार महेंद्रशेठ दळवी,शिवसेना नेत्या रणरागिणी मानसी दळवी,अतीरिक्त सी.ई.ओ.सत्यजीत बडे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी गिताजंली पाटील,अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

     यावेळी आम.महेंद्र दळवी यांनी महिलांकरिता स्वच्छता, आरोग्य,कुटुंब, कायदे विषयक व इतर विषयावर मार्गदर्शन केले.त्यावेळी लाभार्थी,मोठ्या प्रमाणात महिलावर्ग उपस्थित होत्या. यावेळी उपस्थीत मान्यवरांचे हस्ते अंगणवाडी सेविकांना मोबाईल वाटप, लेक लाडकी योजना प्रथम हप्ता धनादेश वाटप,अंगणवाडी स्मार्ट किट वाटप तसेच महिला बचत गटांना विविध साहित्य वाटप करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog