मेढा येथील यश पानसरे गुवाहाटीमध्ये चमकला
रोहा (शैलेश गावंड)
रोहा तालुक्यातील मेढा येथील यश विकास पानसरे त्याच्या पुणे येथील (VIT) महाविद्यालया च्या टीम एकलव्य गटाचे नेतृत्व बजावत गुवाहाटी आसाम येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), यांच्या अलचेरिंगा या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवांमधील राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ( VIT ) महाविद्यालय पुणे तसेच रायगड जिल्हा आणि मेढा आणि गावाची शान वाढवली आहे
यश हा विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ( VIT ) पुणे या महाविद्यालयाचा विद्यार्थी असून शालेय अभ्यासात हुशार आहेच तसेच इतर कला, अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावली आहे.यशने रोहा येथील स्पंदन नाट्य संस्थेच्या माध्यमातून अनेक बालनाट्य स्पर्धा तसेच नृत्य स्पर्धांमधून तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धेत उत्तम अभिनय आणि नृत्यकला सादर करून अनेक पारितोषिके मिळवली आहेत.याबाबत यश चे वडील विकास पानसरे यांच्याशी संपर्क साधला असता मिळालेला माहितीनुसार ८ ते १० मार्च दरम्यान गुवाहाटी येथे ही स्पर्धा पार पडली
अलचेरिंगा ला "अल्चेर" असेही म्हटले जाते, हा भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), गुवाहाटीचा वार्षिक सांस्कृतिक उत्सव आहे. हा महोत्सव 1996 मध्ये आयआयटी गुवाहाटीच्या विद्यार्थ्यांच्या गटाने सुरू केला होता. 3 दिवस आणि 4 रात्री व्यापणारा हा सांस्कृतिक महोत्सव अल्चेरिंगा दरवर्षी आयोजित केला जातो. याही वर्षी आठ ते दहा मार्च या कालावधीत आसाम गुवाहाटी येथे हा महोत्सव संपन्न झाला आणि पूणा येथील त्याच्या कॉलेजच्या टीमचे नेतृत्व करणाऱ्या यशने प्रथम क्रमांक पटकावला. 140,000 च्या अपेक्षित सहभागासह आणि 500 हून अधिक महाविद्यालयांच्या सहभागासह, हा सांस्कृतिक महोत्सव प्रख्यात कलाकार आणि प्रोनाइट्सचा समावेश असलेला एक संस्मरणीय कार्यक्रम असतो.अशा या आसाम गुवाहाटी ( IIT ) येथील अलचेरिंगा सांस्कृतिक महोत्सव मधील राज्यस्तरीय स्पर्धेच्या माध्यमातून यशने त्याच्या टीम एकलव्य या महाविद्यालयीन गटाचे नेतृत्व करत त्याच्या "हल्लाबोल" या थीमला प्रथम क्रमांकाने विजयी होऊन विशेष गौरवपूर्ण आणि अभिमानास्पद कामगिरी बजाविली आहे.
या विशेष कामगिरी मध्ये यशला यश मिळवून देण्यासाठी त्याचे आई वडील विकास पानसरे आणि विद्या पानसरे आणि त्याच्या शिक्षकांनीही मोलाचे मार्गदर्शन केले आणि यशने त्याचे प्रयत्न आणि जिद्दीतून सुयश मिळविले त्याबद्दल मेढा ग्रामस्थ शिक्षक आणि सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment