रोह्यात राजकीय भूकंप , लाल सलाम ला राम राम करणार 


रोहा तालुक्यातील शेकापचे दोन बडे नेते खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार 


रोहा : प्रतिनिधी
    रायगड लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रोह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून  भातसई विभागातील व मेढा विभागातील शेतकरी कामगार पक्षातील दोन दिग्गज नेते रायगड  लोकसभा निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार  सध्याचे विद्यमान  खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत अशी विश्वसनीय माहिती सूत्रांनी आदिशक्ती ला दिली आहे.लोकसभा २०२४ च्या निवडणुकीच्या तोंडावर शेकापला दिलेला धक्का मानला जात आहे. याचा नक्कीच फायदा हा सुनिल तटकरे यांना होणार असे भाकीत राजकिय बुजुर्ग मंडळी बोलत आहे.
         आगामी लोकसभा निवडणुका यांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर रायगड लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते व महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे  यांची नावे जाहीर केली गेली आहेत. प्रचार सभेला सुरुवात होण्यापूर्वीच सुनिल तटकरे यांनी शेतकरी कामगार पक्षांचे नेते जयंत पाटील यांनी तटकरे यांच्या वर केलेल्या जहरी टिकेला उत्तर म्हणून मेढा विभाग व भातसई  विभागात ज्याचा दांडगा जनसंपर्क आहे असे जयंत पाटील यांचे विश्वासू सहकारी असलेले शेकापचे  दोन बडे नेत्यांना  आपल्या पक्षात घेऊन या शेकापचा दबदबा कमी करण्यात तटकरे नक्कीच यशस्वी होऊ शकतात हे मात्र नक्की.

Comments

Popular posts from this blog