तळा येथील शिमग्याची संस्कृती पंरपरा आजच्या युगात देखील कायम
तळा- किशोर-पितळे
तळा येथे शिमग्याला विशेष महत्त्व आहे. ऐतिहासिक व पौराणिक धार्मिक असे महत्व असून परंपरा आधूनिक काळात देखील जपली आहे .बदलत्या काळानुसार थोडा फार बदल होत गेला आहे. ग्रामदेवता श्री चंडिका देवी फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच हुताशनी पोर्णिमा ते रंगपंचमी पर्यंत साजरी केली जाते.श्री.चंडिका देवीचे मुळ स्थान तळगड किल्लावर मुघलांच्या साम्राज्य होते. त्या काळात सिध्दी जोहारने या देवतेला बाटवण्याचा प्रयत्न केला.व देवीने गावाच्या बाहेर उडी घेतली ते आजचे ग्रामदेवी चंडीकेचे मंदिर आहे.त्यावेळी पुजा,अर्चा गोसावी समाज करीत असत.व नैवद्य गावात जोगवा मागून शिजवून दाखवला जात असे म्हणून या वाडीचे नाव जोगवाडी असे पडले असा इतिहास दाखवला आहे. देवीचे मुखवटे वेदक यांच्या गादीवरुन नेऊन जोगवाडी ग्रामस्थ हा उत्सव सण भक्ती भावाने, श्रध्देने साजरा करीत आहेत.जोगवाडी पोळेकर (गोसावी )ग्रामस्थ वाजत गाजत चांदीच्या पालखीतून मुख्य वतनदार देशमुख यांच्या घरातून ग्रामदेवता श्री चंडिका देवी मंदिरात नेली जाते व मुळ पाषाणाजवळ मनोभावे प्रार्थना केली जाते व सांगितले जाते की आम्ही गावकरी तुला माहेरी सहाणेवर न्यायला आलो आहोत सर्व गावावर तुझी पाठराखण कायम ठेव व हा होळीका उत्सव आनंदाने साजरा होऊ दे अशी प्रार्थना करून पालखी वाजत गाजत जोगवाडी सहाणेवर नेली जाते.
गोसावी समाज व ग्रामस्थ हे आनंददायी सणाला सुरुवात करतात .सायंकाळी पाच वाजता मोदीचे नाक्यावर तळेगावच्या शंकासूराची व जोगवाडीच्या शंकासूराची सलामी हे खास आकर्षण असते.तमाशा,नाच,बहुरूपी सोंग, आदीवासी महिला टिपरी,डेरा असे विविध कला करून रंगत येते. कासेवाडी, उसर,तांबडी, तारास्ते, गिरणे अशा ग्रामीण भागातील तमाशा,नाच गोपाळ कृष्णाचा रास क्रीडा, गौळणीचा नाच हे देखील रंगत चढवीत असतात. पौर्णिमेच्या दिवशी गावकीची मानाची मोठी होळी वतनदार देशमुख याच्यां हस्ते लावली जाते त्यानंतरच इतर होळ्या लावल्या जातात. रात्री देवीचा छबिना ११ वाजता काढला जातो तो पहाटे पर्यत असतो.पुन्हा दोन दिवस दुपारी ३ वा.छबिना काढला जातो तो रात्री १० वा. पर्यंत असतो. नंतर सुहासिनी पुजन मानपान,नवस, देणी,मागणी अर्पण केले जातात.या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पिक्चर दाखवले जात जागर, भजन असे कार्यक्रम करून पाच दिवस हा धार्मिक सोहळा साजरा करीत आहेत.या सणाला संपूर्ण गावातील माहेरवाशिणी खास होळीच्या सणाला माहेरी येत असतात.हि सर्वांना पर्वणी आहे ही धार्मिक परंपरा या काळात देखील जपली गेली आहे.
Comments
Post a Comment