रोह्यात कुणबी समाज एकवटला, कुणबी दाखल्यासाठी महिलाही आक्रमक, मोर्च्यात सहभागी होण्याचा निर्धार.


रोहा (श्याम लोखंडे ) 

               कुणबी दाखला प्रश्नांवर आता रोहा तालुक्यात कुणबी समाज बांधव तथा युवक आता चांगलाच पेटून उठला आहे. शासनाने लादलेली जातपडताळणी साठी १९६७ सालाच्या पुराव्याची अट रद्द करण्यात यावी तसेच जन्माने आणि कर्माने आम्ही कुणबी आहोत आम्हाला आमचा हक्क मिळालाच पाहिजे यासाठी येत्या १४ डिसेंबर रोजी एकदिवसीय लक्षवेधी आंदोलन रोहा तालुक्यात पुकारण्यात आले आहे. अभी नहीं तो कभी नहीं ही दाखला आमच्या हक्काचा अशी भूमिका येथील युवकांनी घेत कुणबी दाखल्यासाठी लक्षवेधी आंदोलन छेडण्याचा निर्धार केला आहे यासाठी तालुक्यातील गावोगावी फिरून सदरच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे.

        कुणबी राजा जागा हो, समाजाचा धागा हो,आज नाही तर कधी नाही त्यामुळे आता कुणबी समाज्याच्या महीला देखील कुणबी दाखल्यासाठी गावात आक्रमक होत असताना दिसत आहेत .आमच्या मुलांचा ओबीसी कुणबी दाखल्या अभावी शैक्षणीक, नोकर भरती, व्यवसायात अर्थिक दृष्टया नुकसान होत आहे. त्यामुळे समाजाच्या भावी पिढीच्या उन्नतीसाठी हा दाखला महत्वाचा आहे. सरकारने जात पडताळणी करण्यासाठी लादलेले निकष त्यामुळे जात पडताळणी होत नाही. आम्ही परंपरागत जन्माने आणि कर्माने कुणबी आहोत मात्र आमच्या पूर्वजांनी केवळ खोतांची जमीन कसली त्यामुळे आम्ही आधीपासून मागास आहोत .बेदखल कुळांचा प्रश्न अद्याप शासनाच्या पटलावरच आहेत. आमचे पूर्वीचे बापदादा अशिक्षित त्यामुळे पूर्वीच्या नोंदी आम्हाला मिळणे कठीण झाले आहेत .त्यामुळे यावर शासने लावलेली जात पडताळणी १९६७ अट ही रद्द करण्यासाठी तालुक्यातील कुणबी समाजाच्या युवती तसेच महीला देखील कुणबी दाखल्यासाठी आक्रमक होत या लक्षवेधी आंदोलनात सहभागी होण्याच्या प्रतीक्षेत दिसत आहेत.


           कुणबी समाज नेते तथा रायगड जिल्हा ओबीसी सेल चे अध्यक्ष सुरेश मगर, रोहा तालुका कुणबी समाज अध्यक्ष शिवराम भाऊ शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष शंकर भगत,युवक अध्यक्ष अनंत थिटे, यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी मंगळवारी ५ डिसेंबर रोजी तालुक्यातील खांब विभागातून मौजे गोवे येथून श्रीफळ वाढवून या कुणबी दाखला प्रश्नांवर झंझावत तथा मोहिमेला प्रारंभ करत त्याची जनजागृती करत आंदोलनात बहुसंख्येने कुणबी बांधव तसेच युवक युवती महिलांनी सहभाग होण्याची मोहीम हाती घेतली असुन मोहिमेला तालुक्यात गावोगावी उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे. गावातील कुणबी महीला माता भगिनी देखिल या मोहिमेचे स्वागत करत आंदोलनात सहभागी होण्याचे आश्वासन देत आहेत.

                  १४ डिसेंबर रोजी आंदोलनात बहुसंख्येने कुणबी समाज बांधव उपस्थित राहण्याचे आवाहन तसेच कुणबी युवक व कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ग्रामीण शाखा रोहा चे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबवण्यात येत असून या महिलेला सर्वत्र प्रतिसाद मिळत असल्याचे जागोजागी दिसत आहे.

Comments

Popular posts from this blog