सोनसडे ग्रामपंचायतीला जिल्हा स्तरीय समितीची भेट  


आर. आर. पाटील स्वच्छ व सुंदर गाव समितीकडून पहाणी

तळा सोनसडे - कृष्णा भोसले. 


                  तळा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सोनसडे या ग्रामपंचायतीमध्ये आज रायगड जिल्हा परिषद जिल्हा स्तरीय समितीने भेट दिली. या समितीने गावातील स्वच्छता व पाणीपुरवठा व वेगवेगळ्या प्रकारच्या सामुदायिक व वैयक्तिक लाभाच्या योजना कशा प्रकारे अमंगल बजावणी करत सुदंर  व स्वच्छ गावाच्या संकल्पनेचा आढावा घेतला. 

    या समितीमध्ये जिल्हा कृषी विकास अधिकारी तथा समितीचे अध्यक्ष मिलिंद चौधरी, पाणीपुरवठा उप अभियंता रायगड जिल्हा परिषद तथा समिती सदस्य श्रीकांत पाटील यांचे गावात प्रवेश करताच महिलांनी आरती करून औक्षण केले.तदनंतर ग्रामपंचायत मध्ये समितीचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी सरपंच माधुरी पारावे, सदस्य परशुराम वरंडे,व इतर सदस्य,गावातील जेष्ठ सदस्य, महिला मंडळ अध्यक्षा मनिषा बोंबले व महिला मंडळाच्या सदस्यां मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महिला व पुरुषांसमवेत समितीने वेगवेगळ्या प्रकारे प्रत्यक्षात माहिती घेतली. ग्रामपंचायतीमध्ये विविध प्रकारे स्वच्छता व अनेक योजनांचा पुरेपूर वापर केला गेल्याने समितीने समाधान व्यक्त केले आहे. ग्रामसेवक उमाजी माडेकर यांनी विविध योजनांची माहिती व रेकॉर्ड छान ठेवले असुन सर्वाच्या सहकार्य घेऊन ग्रामपंचायत सुंदर व स्वच्छ ठेवल्याने समाधान व्यक्त केले आहे. 


    या कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते कृष्णा भोसले यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये २००० सालापासून आजतागायत ग्रामपंचायतीमध्ये वेगवेगळ्या अभियानात सहभागी होऊन यशस्वी झेप घेतली आहे. आणि सर्वाच्या सहभागातून ग्रामपंचायत पुरस्काराने सन्मानित झाली या अभियानात आम्ही यशस्वी होऊ आणि आर. आर. पाटील  स्वच्छ व सुंदर गाव अभियानात यशस्वी होऊ असा आत्मविश्वास व्यक्त केला. तर जेष्ठ सदस्य परशुराम वरंडे यांनी आभार व्यक्त करत सभा बैठक संपल्याचे जाहीर केले.

Comments

Popular posts from this blog