रोह्यात जातीच्या दाखल्यासाठी कुणबी लाट उसळली...


हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून दिले तहसिलदार व प्रांतांना मागण्यांचे निवेदन..

खारी-रोहा,दि.१४(केशव म्हस्के):- जातीच्या दाखला मिळविण्याकामी असणा-या जाचक अटी रद्द करून समाजाचा जातीचा दाखला मिळावा या मागणीसाठी आज गुरुवार दि.१४ रोजी कुणबी समाजाची प्रांताधिकारी व तहसीलदार कार्यालयावर प्रचंड कुणबी लाट उसळून व विराट मोर्चा काढून व मागण्यांचे निवेदन देऊन शासनाचे आपल्या मागणीकडे लक्ष वेधून घेतले...

     कुणबी समाजोन्नती संघ मुंबई व जिल्हा जिल्हा समन्वय समिती यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा तालुका कुणबी समाजाने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून भव्य स्वरुपात मोर्चा काढून प्रशासनाने आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेतले.जि.समन्वय अध्यक्ष ज्ञानदेव पवार शंकर म्हसकर,शिवराम शिंदे,शिवराम महाबळे, शंकर भगत, सुरेश मगर,अनंत थिटे, रोहिदास दुसार,दिनेश राटाटे,सुहास खरीवले, दत्ताराम झोलगे,गोपीनाथ गंभे, मारुती खांडेकर, रामचंद्र चितळकर,पांडुरंग बाईत,रामचंद्र सकपाळ,मुंबई शाखा युवक अध्यक्ष शरद गंभे, उपाध्यक्ष सुनील ठाकूर,बाबू इप्ते, मंगेश सानप, जिल्हा युवक अध्यक्ष सचिन कदम,महेश बामुगडे,मंगेश देवकर, शशिकांत कडू,संजय मांडुलसकर, विकास खांडेकर,रमण कापसे,अमित मोहिते, प्रमोद जांभेकर, संतोष भोईर,गजानन बामणे, संतोष देवळे,हिराजी शिंदे,राजेंद्र खिरिट,अमोल शिंगरे,रवींद्र अहिरे,खेळू ढमाळ,संदेश लोखंडे ,सागर सानप,माधव आग्री, यशवंत हळदे,महेश भगत,महिला जि.उपाध्यक्षा शिल्पा मरवडे,रविना मालुसरे आदी प्रमुखांसह सर्व विभागांचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच हजारोंच्या संख्येने समाजबांधव व भगिनी तसेच युवक उपस्थित होते.

      रोहा तालुक्याच्या इतिहासात न भूतो न भविष्यती मोर्चा काढून सा-याच तालुक्याचे लक्ष वेधून घेतलेल्या या मोर्च्यासाठी संपुर्ण तालुक्यातील खेड्यापाड्यातील व दुर्गम भागात राहणारे हजारोंच्या संख्येने कुणबी समाज बांधव व भगिनी तसेच युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवून आपल्या समाजाची एकजूट दाखवून दिली.अतिशय शांततेच्या मार्गाने व कायद्याच्या चौकटीत राहून कुणबी समाजाने प्रांताधिकारी व तहसीलदार यांना आपल्या मागणीचे निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधून घेतले.या मोर्चाचे व कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार सतिश भगत व अरूण आगळे यांनी केले.

ठळक मुद्दे....

 न भूतो न भविष्यती मोर्चा 

कुणबी समाजाचा हा मोर्चा रोहा तालुक्याच्या इतिहासात न भूतो न भविष्यती ठरला असून या मोर्च्याने संपुर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतल्याने सर्वत्र मोर्चाचीच चर्चा होताना दिसून आली.

 जेष्ठांसह महिलांचा उत्स्फूर्त सहभाग 

मोर्च्याला पाठिंबा देण्यासाठी जेष्ठ मंडळी व महिलावर्गाने देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन मोठी उपस्थिती दर्शविली.

विविध घोषणा मोर्चात विशेष लक्षवेधी ठरल्या 

कुणबी समाजाचा विजय असो,गृह चौकशी अहवाल सादर करा,कुणबी राजा जागा हो ऊठ समाजाचा धागा हो,अभी नहीं तो कभी नहीं दाखले दोन सही सही,१०० % दाखले मिळालेच पाहिजे या व अशा विविध घोषणा यावेळी लक्षवेधी ठरल्या.

प्रमुख नेत्यांचे मार्गदर्शन

समाज नेते जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पवार,युवक अध्यक्ष अनंत थिटे, तालुकाध्यक्ष शिवराम शिंदे,समाज नेते सुरेश महाबळे,सुरेश मगर यांनी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले.

उत्कृष्ट नियोजन व चोख व्यवस्था 

मोर्च्याला कोणत्याही गोष्टींची उणिव भासू नये यासाठी समाजाकडून उत्कृष्ट नियोजन करून व चोख व्यवस्था करण्यात आली होती.तर पोलीस यंत्रणेनेही चांगल्या प्रकारचे सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog