कुडा लेणीच्या सुशोभीकरणामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार-ना.अदिती तटकरे
जगाला युद्ध नको बुद्ध हवाय-माजी सभापती हिराचंद तांबे
तळा संजय रिकामे.
तळा तालुक्यातील कुडा लेणी या पर्यटनस्थळाचा विकास होऊन या ठिकाणी अधिकाधिक संख्येने पर्यटक यावेत, यासाठी महिला बालकल्याण मंत्री ना.आदिती तटकरे यांनी प्रयत्न केले त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि कुडा लेणी पर्यटन विकास आराखडा तयार करून कुडा लेणी सुशोभीकरणासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला या कामाचे भूमिपूजन ना.अदिती तटकरे यांच्या शुभहस्ते (दी.१८ डिसेंबर) रोजी करण्यात आले या भूमिपूजन सोहळ्यासाठी मांदाड ग्रामपंचायत सरपंच लता करंजे, उपसरपंच अनंत लोखंडे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे,तहसीलदार स्वाती पाटील, चरई खुर्द सरपंच प्रवीण अंबारले, पढवण सरपंच परशुराम कदम,माजी सभापती हिराचंद तांबे,माजी सभापती अक्षरा कदम माजी सभापती गीता जाधव,माजी उपसभापती गणेश वाघमारे, नाना भौड,जान्हवी शिंदे, अॅड.उत्तम जाधव,रामदास मोरे,धनराज गायकवाड,किशोर शिंदे,सदानंद येलवे,विजय जाधव,प्रकाश गायकवाड, भीमराज जाधव,अनंत मोरे,सचिन गवाणे,भारतीय बौद्ध महासभा तळा बौद्धजन पंचायत समिती तळा बौद्धजन सेवा संस्था तालुका तळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.
ना.अदिती तटकरे आपल्या भाषनाणात म्हणाल्या की रायगड जिल्ह्यामधील ऐतिहासिक पर्यटनस्थळांपैकी तळा तालुक्यातील कुडे प्राचीन बौध्द लेणीचा उल्लेख केला जातो. जगाच्या इतिहासामध्ये कुडे प्राचीन बौद्ध लेण्यांची नोंद पहावयास मिळते. सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी लेण्यांची निर्मिती केली. येथे 26 कोरीव लेण्यांचा समूह कोरलेला आहे.या लेण्यांची नोंद इ.स. 1848 मध्ये सापडली असून या लेण्या इ.स. पूर्व सहाव्या शतकात स्थापन करण्यात आलेल्या आहेत. लेणीतील 26 गुहांपैकी 4 चैत्यगृहे या ठिकाणी आढळतात. भगवान गौतम बुध्दांच्या कोरीव प्रतिमादेखील यामध्ये आहेत. गेली अनेक वर्षे नागरिकांकडून लेणीचा विकास करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी मी पालकमंत्री असताना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तत्कालीन प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर आणि तहसीलदार यांच्यासह कुडा बौध्द लेणी येथे प्रत्यक्ष पाहणी करून पर्यटन वृद्धीच्या दृष्टीने काय करता येईल,यासाठी प्रयत्न केले परंतु मधल्या काळात कोविड,चक्री वादळ अशी संकट आपल्यावर आली पण कुडा लेणी संदर्भात सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यानंतर आज कुडा लेणी सुशोभीकरण कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते होत आहे हे मी माझे भाग्य समजते.कुडा लेणीच्या सुशोभीकरणामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
येथील काही वक्त्यांनी Meditation centre उभारण्याची मागणी केली या मागणीची दखल घेत Meditation centre कुडा लेणी येथे उभारणार असल्याची घोषणा यावेळी ना.अदिती तटकरे यांनी केली मनाची एकाग्रता साधून सत्याचा अनुभव घेता यावा यासाठी 'ध्यान साधना' महत्त्वाची आहे. ही ध्यान साधना खऱ्या अर्थाने साधण्यासाठी कुडा लेणी सारखे ठिकाण आपल्याला मिळाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.या ठिकाणी वन खाते आणि पुरातत्व खाते आहे यांच्या बरोबर समन्वय साधून आपल्याला काम करायचे आहे येथे येणारा पर्यटक येथील काम पाहून सुखावला पाहिजे अशी भूमिका ना.तटकरे यांनी व्यक्त केली.
भारतात आणि जागतिक स्तरावर सर्व-समावेशी आणि शाश्वत विकसासाचे ध्येय गाठण्यासाठी आज जगला युद्धाची नसून बुद्धाच्या विचारानुसार पुढे जाण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी माजी समाज कल्याण सभापती हिराचंद तांबे यांनी केले.तटकरे कुटुंबातील कन्या अदिती तटकरे यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष राज्यमंत्री आणि आता कॅबिनेट मंत्री असा प्रवास आम्ही पहिला आहे अती प्राचीन असलेल्या या कुडा लेणीच्या संशोधनासाठी जागतिक पातळीवरचे संशोधक येथे येवून गेले या वास्तू साठी आज ना.तटकरे यांनी ५ कोटी रुपये मंजूर केले याचा अभिमान आम्हाला आहे, कोणताही मनुष्य हा त्याच्या जन्माने उच्च-नीच ठरत नाही. तर तो त्याच्या कर्माने श्रेष्ठ ठरतो असतो असे त्यांनी यावेळी सांगितले माजी नगरसेवक प्रकाश गायकवाड यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
Comments
Post a Comment