१४ डिसेंबर रोजी होणाऱ्या कुणबी भव्य मोर्चास खारी - गोफण विभागातून ५०० हून अधिक समाज बांधव सहभागी होणार..
खारी/रोहा (केशव म्हस्के)१२ डिसें:-
रोहा प्रांताधिकारी कार्यालयावर जातीच्या दाखल्या प्रश्र्नी गुरूवार १४ डिसेंबर रोजी होणाऱ्या भव्य मोर्चा व धरणे आंदोलनात खारी - गोफण विभागातून ५०० हून अधिक समाज बांधव सहभागी होणार..
आपण सारे जन्माने व कर्माने कुणबी आहोत,तरीही आपल्याला "कुणबी जातीचा दाखला मिळत नाही " दाखला काढण्यासाठी व जात पडताळणीसाठी १९६७ पूर्वी आपण कुणबी असल्याची नोंद शासन पुरावा म्हणून मागते.मात्र आपल्याकडे अशी नोंद लिखित स्वरूपात नसल्याने आपण जातीच्या दाखल्यापासून वंचित राहतो.केवळ नोंद नाही म्हणून कुणबी नाही असे कुणालाही नाकारण्याचा अधिकार नाही.आजवर आपल्या अनेक पिढ्या दाखल्यांअभावी OBC सवलतींचा लाभ घेऊ शकल्या नाहीत,हे आपले दुर्दैव आहे.आपल्यावर प्रचंड अन्याय झाला आहे..
जातीच्या दाखल्यासाठी व जात पडताळणी साठी १९६७ पूर्वीच्या पुराव्याची जाचक अट रद्द झालीच पाहिजे ,आदी प्रमुख मागण्यांसाठी रोहा तालुका कुणबी युवक मंडळाने, कुणबी समाजोन्नती संघ शाखा रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या भव्य मोर्चा व धरणे आंदोलनात खारी - गोफण विभागातून ५०० हून अधिक समाज बांधव सहभागी होणार असल्याचा विश्वास खारी विभागीय समाज नेते श्री.दत्तात्रेय काळे (सरपंच - ग्रूप ग्राम पंचायत खारगाव)यांनी पत्रकारांना माहिती देताना दिला ....
Comments
Post a Comment