कोलाड, धगडवाडी येथे 14 डिसेंबर रोजी अमृतधारा गोशाळेचे उद्घाटन

श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य श्री राघवेश्वर भारती महास्वामी  उपस्थित राहणार


रोहा दि. 12 डिसेंबर (शरद जाधव)

         रोहा तालुक्यातील धगडवाडी येथे अमृतधारा गोशाळेचे उद्घाटन गुरुवार दिनांक 14 डिसेंबर रोजी सकाळी ठिक 12 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे .सदर उद्घाटन श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य श्री राघवेश्वर भारती महास्वामीजी यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे याकरता सर्व भक्त गणांनी उपस्थित राहावे असे आवाहन मा-- राष्ट्रा  प्रतिष्ठान ट्रस्टचे कृष्णा भट यांनी केले आहे.

          अनेक वर्षानंतर मुंबई व पुणे भक्तगणांच्या इच्छेनुसार श्री रामचंद्रपुर मठाधिपती श्री राघवेश्वर भारती महास्वामी यांचे मुंबई येथे दिनांक 8. 12. 20 23 रोजी आगमन झाले आहे. तेथील भक्तगणांना दर्शन देऊन बुधवार दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कोलाड धगडवाडी येथे भट फार्म येथे सदर गुरुजी येणार आहेत. व गुरूवार 14 डिसेंबर रोजी सकाळी ठीक बारा वाजता धगडवाडी येथील अमृतधारा गोशाळेचे उद्घाटन श्री राघवेश्वर भारती महास्वामी गुरुजी यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.तरी सर्व भक्त गणांनी महास्वामी गुरुजी यांच्या अमृत प्रवचन व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मा-- राष्ट्रा प्रतिष्ठानचे कृष्णा भट यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog