तरुणांनी नोकरीच्या शोधात शहरात न जाता विविध फळ प्रक्रिया उदयोग उभारावेत. - तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमार्फत वावेहवेली येथे काजू प्रक्रिया युनिटचे उद्घाटन.
तळा : किशोर पितळे
तळा तालुक्यात काजू लागवडीस पोषक वातावरण आहे व बऱ्याच शेतकऱ्यांचा काजू लागवडीकडे कल सुद्धा वाढत आहे. तसेच जुन्या उत्पादनक्षमता काजू बागा सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे काजू प्रक्रियेस मोठया प्रमाणावर वाव आहे. त्यामुळे येथील तरुणांनी नोकरीच्या शोधात मुंबई, पुणे येथे न जाता विविध फळप्रक्रिया उदयोग उभारले पाहिजेत यासारख्या विविध फळांवरील छोटी फळ प्रक्रिया युनिट प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने मार्फत सुरु करावीत यासाठी कृषीविभाग अनुदान देण्यासाठी सहकार्य करेल असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी वावेहवेली येथे केले. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजने अंतर्गत लाभ घेतलेल्या वावेहवेली येथील लाभार्थी सागर पारावे यांच्या काजू प्रक्रिया युनिटचे उद्घाटन तालुका कृषीअधिकारी आनंद कांबळे यांचे हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
यावेळी सागर पारावे यांनी आपल्या प्रक्रिया युनिटची माहिती उपस्थितांना दिली. या प्रक्रिया युनिटमुळे गावातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनीसांगितले तसेच काजू प्रकल्प उभारणी मध्ये कृषी विभागाच्या प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची मदत झाल्याचे त्यांनी सांगितले या प्रक्रिया युनिटचा परीसरातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होणार असून त्यांनी उत्पादीत केलेल्या काजूला बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच या प्रकल्पासाठी कृषी विभाग व स्वदेश फाउंडेशन यांनी सहकार्य केले असून योजने बाबत समाधान व्यक्त केले.यावेळी तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व आर डी सी सी बँकेचे संचालक ज्ञानेश्वर भोईर,मंडळ कृषी अधीकारी सचिन जाधव, आत्मा सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन लोखंडे, नोनो सिड कंपनीचे प्रतिनिधी महाडिक,यशवंत पारावे, योगीता पारावे,सागर पारावे,श्वेता पारावे व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment