काकडशेत ग्रामपंचायतीमध्ये भारत संकल्प विकसित भारत रथयात्रेचा जोरदार स्वागत!
तळा सोनसडे- कृष्णा भोसले.
सध्या देशात विकसित भारत संकल्प रथयात्रा गावागावात येत असून त्याचाच भाग म्हणून काकडशेत ग्रामपंचायतीमध्ये हा रथ येताच जोरदार स्वागत करण्यात आले. सुरवातीला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी सरपंच शरद सारगे,उपसभापती तुकाराम खेडेकर, उपसरपंच अर्चना तापकीर,ग्रा.पं.सदस्य ,महीला मंडळ अध्यक्षा, पदाधिकारी, सर्व पोलीस पाटील, सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशाताई, तसेच महीला बचत गट, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रथयात्रेत चित्र फितीव्दारे विविध योजनांची माहिती देण्यात आली. या वेळी अनेक योजना देशात मोठ्या प्रमाणात राबवत असुन त्या जनसामान्यांच्या फायदेशीर ठरत असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या. तर अनेक योजनांची माहिती चित्रफिती व्दारे पहावयास मिळाल्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध योजनेचे कार्ड वाटप करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
याप्रसंगी रथयात्रेबरोबर आलेले शासकीय अधिकारी
आदिवासी प्रकल्प अधिकारी श्री निलेश नाईक, तळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वंदनकुमार पाटील, डॉ. श्रेयस कुलकर्णी, किशोर मालुसरे तलाठी, कोतवाल किशोर चौगुले, विकासत भारत प्रकल्प ची संपूर्ण टीम,यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप चांगले काम केले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौं. उल्का माडेकर मॅडम यांनी केले.
Comments
Post a Comment