विद्यार्थी ,पालक आणि शिक्षकाच्या सहभागाने 'कार्निव्हल २०२३' संपन्न
जे.एम.राठी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून २०२३ वर्षाची जल्लोषात सांगता
रोहा प्रतिनिधी
जे.एम.राठी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, रोहा येथे शनिवार, १६ डिसेंबर २०२३ रोजी उत्साहपूर्ण कार्निव्हल उत्सव आनंदाने साजरा करत विद्यार्थ्यांनी जलोषात २०२३ वर्षाची सांगता केली . या कार्निव्हलने तरुण विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याच्या आणि अनेक नवीन गोष्टी शिकून घेण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या, ज्या त्यांच्यातील उद्योजकीय कौशल्ये निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. शालेय कार्निव्हल हे असंख्य क्रियाकलापांसह संपूर्ण मनोरंजनाचे पॅकेज आहे. यामध्ये विध्यार्थ्यांना विविध प्रकारचे रुचकर खाद्य पदार्थ्यांचा आस्वाद यावेळी घेता आला. याशिवाय अनेक गमतीशीर खेळ, नृत्य, संगीत आणि अनेक कार्यक्रमाचा यात समावेश होता. हा एक असा दिवस आहे जो विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या व्यस्त वेळापत्रकातून विश्रांती देत त्यांचे ताण तणाव दूर करण्यासाठी असे उपक्रम राबवले जाते. विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या मनोरंजक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्यांची प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी कार्निव्हल हे योग्य व्यासपीठ आहे.
या कार्निव्हल महोत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून माननीय महिला व बालविकास मंत्री अदिती वरदा सुनील तटकरे यांची बहुमोल उपस्थित होती . यावेळी शाळेच्या संचालिका रचना राठी, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
अदिती तटकरे म्हणाल्या, "मी देखील याच शाळेची विद्यार्थी आहे. जेव्हा जेव्हा मी शाळेत येते त्यावेळी माझ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. या जागेतून मला खूप सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. येथे माझ्या अनेक सुखद आठवणी आहेत. शाळेचे उपक्रम हे नेहमीच विध्यार्थ्यांना प्रेरणा देणारे असतात. या अशा कार्क्रमातून पालक , शिक्षक आणि विध्यार्थी यांच्यातील संवाद अधिक खुलून येते. यामुळे विद्यार्थ्यांना त्याच्या दैनंदिन जीवनातून काही आनंदाचे क्षण अनुभवता येतात. या अशा उपक्रमासाठी मी व्यवस्थापनाचे कौतुक करते. "
रचना राठी म्हणाल्या, " या कार्निव्हल महोत्सवाने शाळेचे मैदान दुमदुमले हि फारच आनंदाची बाब आहे. आपल्या व्यस्त जीवन शैलीतून पालकांनी आपल्या मुलांसाठी वेळ काढत येथे उपस्थित राहिले हे पाहून फार आनंद झाला. आज येथे शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी अनेक खेळ, कला आणि हस्तकला कॉर्नर यामध्ये आपला सहभाग नोंदवला. त्याचसोबत या कार्निव्हल मध्ये टॅटू पेंटिंग, सेल्फी पॉइंट, दागिने आणि कपड्यांचे स्टॉल्स देखील उभारण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे हे स्टॉल शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सहकाऱ्याने उभारण्यात आले. त्याचबरोबर मुलांच्या आवडीचे फूड कोर्टसह विविध राइड्स आणि गेम्सचा समावेशही यामध्ये आहे."
आनंदी वातावरणात सहभागांच्या उत्स्फूर्त गर्दीने हा कार्निव्हल सोहळा संपन्न झाला. विद्यार्थी , पालक आणि शिक्षकांसाठी हा एक संस्मरणीय क्षण बनला. कार्यक्रमाची सांगता लकी ड्रॉने झाली.
Comments
Post a Comment