वरसगाव गावचे महादेव सानप गुरुजी यांचे निधन
रोहा 4 डिसेंबर (शरद जाधव)
रोहा तालुक्यातील वरसगाव गावचे कुणबी सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच महादेव नथुराम सानप उर्फ सानप गुरुजी यांचे बुधवार दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने जुन्या काळातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व हरपल्याची भावना अनेक जानकारांनी व्यक्त केली.
महादेव नथुराम सानप हे सानप गुरुजी म्हणून सर्वांना परिचयाचे होते.शिक्षकी पेक्षा असल्याने अभ्यासू व्यक्तिमत्व होते. गावच्या सामाजिक अध्यात्मिक राजकीय कामात ते हिरारीने भाग घेत असत. वरसगाव ग्रामपंचायत मध्ये त्यांनी सरपंच पद भूषविले होते. त्यांच्या काळात ग्रामपंचायतीच्या कारभाराला विशेष शिस्त लागली होती गावच्या तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष पदही त्यांनी भूषवले होते त्यांना वृत्तपत्र वाचनाची विशेष आवड होती. शिक्षक म्हणून तळवली शाळेत सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी गावच्या सामाजिक कामात हिरारीने सहभाग घेतला होता. त्यांनी आपले कुटुंब उत्तम सांभाळले होते. त्यांची पुढची पिढी उच्च शिक्षण घेत आहे. अंत्ययात्रेस प्रचंड जनसमुदाय जमला होता.
पश्चात दोन मुले दोन मुली सुने नातवंडे असा मोठा परिवार आहे.
दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी तर उत्तर कार्य रविवार दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी वरसगाव या ठिकाणी राहत्या घरी आयोजित केले आहेत.
Comments
Post a Comment