वावेहवली धरणाच्या सिंचन क्षेत्रातील कालव्याच्या दुरुस्तीची मागणी! धरणाचे पाणी कालवा दुरुस्त होत नसल्याने शेतीला पोहचत नाही
कालव्याची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी खैराट ग्रामस्थांनी मंत्री अदिती तटकरे यांचेकडे केली आहे.
तळा कृष्णा भोसले.
तालुक्यातील वावेहवली हे धरण निर्माण होण्यासाठी अनेक शेतकरी बांधवाना भूमीहीन व्हावे लागले. परंतु या धरणाच्या सिंचन क्षेत्रातील खालील शेतकरी बांधवाच्या शेतीसाठी पाणी पोहचत नाही. या भागातील कालवा हा नादुरुस्त आहे. त्यामुळे शेतीला पाणी पोहचत नाही. मग या कालव्याची दुरुस्ती का केली जात नाही असा प्रश्न शेतकरी बांधवाच्या वतीने केला जात आहे.
याबाबत आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना बळीराजा संघटना तळा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर यांनी सांगितले की धरणात एवढे पाणी असुन ते शेतीसाठी सोडले जात नाही. त्याचे एकमेव कारण म्हणजे कालवा नादुरुस्त आहे.आम्ही याबाबत शेतकरी बांधवाच्या भेटी गाठी घेतल्या पण कालवा नादुरुस्त आहे. त्यामुळे शेतीला पाणी पोहचत नाही.या भागातील बामणघर ,खैराट,राणेचीवाडी, वावेहवली,येथील तरुण शेतकरी बांधवाच्या शेतीसाठी पाणी मिळत नाही हे लक्षात घेऊन खैराट मुंबई व ग्रामस्थ मंडळाने मंत्री अदिती तटकरे यांना लेखी निवेदन दिले आहे.
संबंधित खात्याने कालव्याची तातडीने दुरुस्ती करावी व शेतीसाठी पाणी उपलब्ध करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
Comments
Post a Comment